मराठमोळी अभिनेत्री अभिज्ञा भावे हिच्यासोबत अलीकडे मुंबईच्या रस्त्यावर एक धक्कादायक प्रकार घडला होता. रात्री शूटींग संपवून रिक्षानं घरी परतत असताना दुचाकीवरील दोन अज्ञातांनी तिच्या हातातला मोबाईल हिसकावून नेला होता. या घटनेदरम्यान अभिज्ञा किरकोळ जखमीही झाली होती. ही घटना ताजी असताना आता टेलिव्हिजनची लोकप्रिय अभिनेत्री कृतिका देसाई हिच्यासोबत दिवसाढवळ्या असाच एक धक्कादायक प्रसंग घडला.कृतिका सध्या ‘पंड्या स्टोअर’ या मालिकेत सुमनची भूमिका साकारतेय. कृतिकाने आपल्या सोशल अकाऊंटवर धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. या घटनेचा व्हिडीओही तिने पोस्ट केला आहे.अनेक वर्षांपूर्वी ‘चंद्रकांता’ या मालिकेत कृतिकाने विषकन्या शब्याची भूमिका साकारली होती. शक्ती-अस्तित्व के एहसास की, उतरन, कुमकुम एक प्यारा सा बंधन अशा अनेक मालिकांमध्ये तिने काम केलंय.
नेमकं काय घडलं?कृतिका शूटिंग आटोपून घरी जायला निघाली होती. दिवसाढवळ्या गोरेगाव येथील फिल्मसिटी ते गोकुळधाम या परिसरात बाईकवर आलेल्या तीन अज्ञात इसमांनी तिची गाडी अडवली. गाडीत ड्रग्ज असल्याचं खोटं सांगून गाडी चेक करायची आहे असं ते म्हणाले. कृतिकाला प्रथमदर्शनी त्यांच्यावर संशय आला आणि तिने त्यांना आयडीकार्ड विचारले. जवळचे पिवळ्या रंगाचे काही कागद दाखवून त्यांनी कृतिकाच्या हाताचा वास घेण्याचा प्रयत्न केला. कृतिका लगेच अलर्ट झाली. लेडी कॉन्स्टेबलला बोलवा आणि मगच तुम्ही माझी तपासणी करा असं तिने ठणकावून सांगितलं. शिवाय प्रसंगावधान राखत लगेच मोबाईलमध्ये ही सर्व घटना रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. त्यांचा कृतिकाकडून पैसे लाटण्याचा इरादा होता. मात्र सर्व मोबाईलमध्ये रेकॉर्ड होत असल्याचं समजताच त्या तिघांनी तिथून पळ काढला.
‘ या घटनेतून मी सुखरूप निसटले मात्र इतरांनी देखील यातून सतर्क राहण्याची गरज आहे. मी या घटनेची सर्व माहिती पोलिसांना देणार आहे आणि त्या तिघांविरोधात तक्रार दाखल करणार आहे.मला अजूनही खात्री आहे की हे लोक तुमच्यासारख्या कलाकारांना किंवा दुसऱ्या कोणालाही लुटायला तयार आहेत. त्यामुळे सतर्क राहा’, असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे.