टीव्ही अभिनेत्री चारू असोपा (Charu Asopa)सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. सतत होणाऱ्या भांडणानंतर तिने पती राजीव सेन(Rajeev Sen) ला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला होता, ज्याची घोषणाही तिने यापूर्वी केली आहे. आता तिनं आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे आणि तिच्या चाहत्यांना व्हिडिओ शेअर करून याबद्दल माहिती दिली आहे. चारू मुलगी जियानासोबत नवीन घरात शिफ्ट झाली आहे.
चारू असोपा तिच्या यूट्यूब अकाउंटवर खूप सक्रिय आहे. ती तिच्या वैयक्तिक आयुष्यातील प्रत्येक अपडेट यूट्यूब व्हिडिओद्वारे शेअर करताना दिसते. अलिकडेच तिने पतीचं सोडून मुलगी जियानासह नवीन घरात शिफ्ट झाली आहे.
चारूने तिच्या व्लॉगचे शीर्षक दिले आहे- 'सत्याला पुराव्याची गरज नसते'. या शीर्षकाद्वारे तिने हावभावांमध्ये सांगितले आहे की ती खरंच राजीव सेनपासून विभक्त होत आहे. व्हिडिओमध्ये चारीने सांगितले की, तिने राजस्थानमध्ये आपल्या आई-वडिलांसोबत दिवाळी साजरी केली. तिच्यासोबत मुलगी जियानाही होती. भिलबारा ते बिकानेर असा प्रवासही त्यांनी मुलीसोबत केला.
तिने असेही सांगितले की ती मागील व्हिडिओवरील नकारात्मक कमेंट्समुळे ती दुःखी आहे. व्हिडिओमध्ये ती म्हणते की, 'रात्री मी झोपण्यापूर्वी, YouTube व्हिडिओंवरील कमेंट्स पाहिल्या आणि तुमच्या कमेंट्स पाहून मला थोडे वाईट वाटले. मला काय बोलावे कळत नाही. असो, प्रत्येकाची स्वतःची मत असतात आणि मी ती बदलू शकत नाही. मला त्यांच्यापुढे काहीही सिद्ध करण्याची गरज नाही.