'बिग बॉस मराठी'च्या घरामध्ये हल्लाबोल टास्कमुळे खूपच तणावाच वातावरण बघायला मिळत आहेत. सदस्यांचा शब्दांचा मारा ऐकायला येत आहे. पण, दादुस म्हणजेच संतोष चौधरी घरातील वातावरण हलकफुलक करण्याचं कामं सुरुवातीपासून करत आले आहेत. कधी हसू आणतात, तर कधी डोळ्यात पाणी आणतात. आज बिग बॉस मराठीच्या घरात रंगणार आहे यमकची जुगलबंदी. त्याची सुरुवात आविष्कारपासून झाली.
आविष्कारने मायक्रोवेव्हमध्ये अंडी उकाडायला ठेवली, पण त्यात पाणीच ठेवायला विसरला म्हणे. त्यावरून दादूस यांची वाक्य सुरू झाली, “आविष्कारने केला अंड्याचा ब्लास्ट, हा त्याचा चान्स होता लास्ट” त्यावर मग तृप्ती देसाई देखील म्हणाल्या, “पण, मीनल आणि सोनाली करते आहे काम फास्ट”. दादुस लगेच म्हणाले, “यमक हीच तुमच्या लाईफची चमक”. त्यावर मग सोनालीने देखील केलं वाक्य “आता आमच्यासमोर कोणाची बोलायची नाही धमक”. तृप्ती ताईंना लगेच टास्कमधलं काहीतरी आठवलं असणार त्या म्हणाल्या “म्हणून तुम्ही काल टाकलं का नमक”? आणि असे अनेक यमक सदस्य जुळवत केले.
“बिग बॉस घरात राम राज्य येईल” विकास पाटीलने बिग बॉस मराठीच्या घरामध्ये घोषणा केली. आज विकास घरामध्ये थेट बिग बॉस यांच्याशी संवाद साधणार आहे. विकास आणि विशाल अशीच कोणत्या तरी मुद्द्यावर चर्चा करत असताना अचानक विकास पाटील म्हणाला “आता जरी रावणाचं राज्य असलं तरी एक ना एक दिवस राम राज्य येईल बिग बॉस काळजी करू नका”.
सत्याच्या बाजूने आम्ही उभे आहोत आणि ही लढाई आम्ही जिंकणार असं देखील विकास म्हणाला. तर मीनलचं देखील तसंचं म्हणण पडलं,“मला आंदोलन करायचं आहे. जी तानाशाही सुरु आहे त्याच्याविरोधात”. विकास पुढे म्हणाला, “बघना सकाळपासून फक्त आपणचं काम करतो आहे आणि ते काय करत आहेत गेम खेळत आहेत. अख्खा महाराष्ट्र बघतो आहे बिग बॉस आता यावर चर्चा पुढे किती रंगली ? कोणाचं काय म्हणणं आहे आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.