Join us

ऐकावं ते नवलंच! प्रेग्नन्सीनंतर ही अभिनेत्री एका कानाने झाली बहिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 1:22 PM

बाळाच्या जन्मानंतर या अभिनेत्रीला एका कानाने ऐकायला येत नाहीये. तिनेच ही गोष्ट सोशल मीडियाद्वारे सगळ्यांना सांगितली आहे. तिने इन्स्टाग्रामला पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे.

ठळक मुद्देछावीने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून लिहिले आहे की, माझ्या पायासोबतच शरीरातील अनेक भागांवर प्रचंड सूज आहे. मणका तर प्रचंड ठणकत आहे आणि यामुळे माझे डोके देखील दुखत आहे. एक विचित्र गोष्ट म्हणजे बाळाचा जन्म झाल्यानंतर मला एका कानाने ऐकायला येणे बंद झाले आहे.

बाळाला जन्म दिल्यानंतर एखाद्या बाईची ऐकण्याची क्षमता कमी होती, अथवा संपूर्णपणे नाहीशी होते हे तुम्ही कधी ऐकले आहे का... हो, हे खरे आहे.... असे काहीसे नुकतेच एका अभिनेत्रीसोबत घडले आहे. अभिनेत्री छावी मित्तलने एका गोंडस मुलाला काही दिवसांपूर्वी जन्म दिला. पण बाळाच्या जन्मानंतर तिला एका कानाने ऐकायला येत नाहीये. तिनेच ही गोष्ट सोशल मीडियाद्वारे सगळ्यांना सांगितली आहे. तिने इन्स्टाग्रामला पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे.

छावीने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून लिहिले आहे की, माझ्या पायासोबतच शरीरातील अनेक भागांवर प्रचंड सूज आहे. मणका तर प्रचंड ठणकत आहे आणि यामुळे माझे डोके देखील दुखत आहे. मी यामुळे साधी बसू देखील शकत नाहीये. डॉक्टरांनी मला जास्तीत जास्त पाणी प्यायला सांगितले आहे. मी दिवसातून पाच लीटर तरी पाणी पिते आणि त्यामुळे मला १५-१५ मिनिटांनी मला बाथरूमला जावे लागते. एक विचित्र गोष्ट म्हणजे बाळाचा जन्म झाल्यानंतर मला एका कानाने ऐकायला येणे बंद झाले आहे. खूपच कमी जणांच्या बाबतीत प्रेग्नन्सीनंतर ही गोष्ट घडते. पण तरीही मी सध्या माझ्या एका आगामी वेबसरिजिवर काम करत आहे. माझा मुलगा झोपल्यानंतर रात्री एक वाजेपर्यंत त्यावर काम करते. 

छावीच्या मुलाचा जन्म १३ मे ला झाला असून तिला एक सहा वर्षांची मुलगी देखील आहे. ती तिच्या मुलाच्या जन्माच्या काही दिवस आधीपर्यंत ऑफिसचे काम नियमितपणे करत होती. तिने १३ मे ला पोस्ट करून लिहिले होते की, मी एका गोंडस मुलाला नुकताच जन्म दिला असून याचे नाव अरहाम हुसैन असे आहे. तुम्ही दिलेल्या शुभेच्छांसाठी मी सगळ्यांचे आभार मानते. 

छावीचे लग्न २००५ मध्ये मोहित हुसैन या दिग्दर्शकासोबत झाले होते. छावीच्या मुलाचा जन्म नऊ नव्हे तर दहा महिन्यांनंतर झाला असे तिनेच सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना सांगितले आहे. 

छावी मित्तालने तीन बहुरानियाँ, तुम्हारी दिशा, घर की लक्ष्मी बेटियाँ, नागिन, कृष्णदासी या मालिकांमध्ये काम केले आहे. एक विवाह ऐसा भी या चित्रपटात देखील तिने छोटीशी भूमिका साकारली होती. 

टॅग्स :टेलिव्हिजन