Join us

टीव्ही अ‍ॅक्ट्रेसच्या दोन महिन्याच्या मुलाचं अभिनय क्षेत्रात पदार्पण, कसा होता त्याचा सेटवरील पहिला दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 3:07 PM

तीन बहुरानियां, तुम्हारी दिशा, घर की लक्ष्मी बेटियां, बंदिनी या मालिकेत झळकलेल्या अभिनेत्रीच्या दोन महिन्याच्या बाळानं वेबसीरिजमध्ये काम केलं.

अभिनेत्री छवी मित्तलचा दोन महिन्यांचा मुलगा अरहमने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. एसआयटी द बेटर हाफ या वेबसीरिजच्या सीझन ४मधून त्याने पदार्पण केलं आहे. अरहमचा जन्म १४ मे रोजी झाला.

युट्युब वाहिनीवरील शिटी आइडियाज ट्रेंडिंग (SIT)ची को फाउंडर आणि अभिनेत्री छवी मित्तलने प्रेग्नेंसीनंतर शोमध्ये पदार्पण केलं आहे. मात्र यावेळेस सीरिजमध्ये छवीसोबत दोन महिन्याचा मुलगा अरहम हुसैनचीदेखील एन्ट्री झाली. छवीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शूटदरम्यानचा मुलगा अरहमसोबत खेळतानाचा फोटो शेअर केला आहे आणि लिहिलं की, छोटे क्युटी अरहमा हुसैन आईसोबत सेटवर आला. त्याच्या पहिल्या शूटवर.

सेटवर अरहमसोबत पहिला फोटो शेअर केल्यानंतर छवीने अरहमचा एक फोटो शेअर केला आणि म्हटलं की, अरहम सेटवर सपोर्ट करण्यासाठी थँक्यू.छवीने म्हटलं की, कालचा दिवस खूप छान होता. माझे प्रिय बाळ अरहम हुसैननं एसआयटीमध्ये पदार्पण केलं. काही गोष्टी लोकांना चित्रीकरणाबद्दल माहित नसतं. आम्ही पूर्ण बारा तास शूटिंग केलं. यावेळी हा छोटा स्टारदेखील सेटवर पाच मिनिटांसाठी आला आणि आम्हाला वीस वेगवेगळे रिएक्शन दिले.

त्यानंतर मी त्याला खोलीत नेलं तिथे तो छान झोपला. हे जणू असं काही होतं की त्याचे आई आणि पप्पा आज शूटिंग करत आहे आणि त्याला सेटवर शांत रहायचे आहे. हे चित्रीकरण घरी असल्यासारखे वाटत होते. त्यासाठी देवाचे आभार. कारण एक दिवस पूर्वी त्याच्या पोटात दुखत होते म्हणून संपूर्ण दिवस रडत होता. त्यामुळे आम्ही शूटिंग रद्द करणार होतो. कारण मी आणि मोहित आम्हा दोघांना त्याला घरी सोडून जायचे नव्हते. त्याला बरं वाटलं आणि शूटसाठी जातं आलं. तु आधीपासूनच खूप विचारशील आहे.

छवी मित्तलच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर प्रेग्नेंसीनंतर महिन्याभरात तिनं ऑफिस जॉईन केलं.

तिने तीन बहुरानियां, तुम्हारी दिशा, घर की लक्ष्मी बेटियां, बंदिनी या मालिकेत काम केलं आहे.

टॅग्स :छावी मित्तल