छोटा भीम हे कार्टून लहान मुलांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. लॉकडाऊनमध्ये मुलांचे फेव्हरेट कार्टूनचे छोटा भीमचे दूरदर्शनवर प्रसरणार करण्यात आले. मात्र आता छोटा भीम अचानक ट्विटरवर ट्रेंड व्हायला लागले आहे. ऐवढेच नाही तर छोटा भीम सध्या सोशल मीडियावर देखील चर्चेचा विषय ठरला आहे. या कार्टूनला घेऊन जो तो न्याय मागतो आहे.
छोटा भीम या कार्टूनमध्ये चुटकी नावाचे पात्र आहे. सोशल मीडियावर प्रत्येकजण चुटकीला न्याय मिळवून देण्याची मागणी करतो आहे. चुटकीला न्याय मिळवून देण्यासाठी सोशल मीडियावर #Justice for Chutki हा हॅशटॅग ट्रेंड करतो आहे.
त्याचे झाले असे की, छोटा भीमच्या शेवटच्या एपिसोडमध्ये भीमचे लग्न चुटकीसोबत न होता ढोलकपूरीची राजकुमारी इंदुमतीशी होते. चुटकी छोटा भीमसोबत नेहमी सावलीसारखी असते, प्रत्येत संकटात ती छोटा भीमची साथ देते. भीम कधीही संकाटात अडकतो तेव्हा चुटकी त्याला लाडू भरवते आणि भीममध्ये शक्ती येते आणि तो शत्रूंचा पराभव करतो असे असताना भीमचे लग्न इंदुमतीशी झाल्याने लोकांचा संताप झाला आहे. लोक आपली नाराजी सोशल मीडियावर व्यक्त करतायेत.