Join us

बालकलाकाराचे डेंग्यूने झाले निधन, मिमिक्रीसाठी होता प्रसिद्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 3:31 PM

बालकलाकार गोकुल साई कृष्णा याचे डेंग्युमुळे निधन झाले आहे. तो मिमिक्रीसाठी प्रसिद्ध होता.

बालकलाकार गोकुल साई कृष्णा याचे डेंग्युमुळे निधन झाले आहे. तो मिमिक्रीसाठी प्रसिद्ध होता. १७ ऑक्टोबरला त्याने अखेरचा श्वास घेतला. त्याने छोट्या पडद्यावरील तेलगू रिएलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता. त्याच्या मिमिक्रीमुळे त्याला ज्युनिअर बालाकृष्णा असं संबोधले जात होते.

गोकुल चित्तूर जिल्ह्यातील मदानापल्ली शहरात राहणारा होता. रिपोर्ट्सनुसार, त्याला मागील दोन दिवसांपासून खूप ताप होता. त्याचे वडील योगेंद्र व सुमनजली यांनी त्याला बंगळुरूतल्या प्रायव्हेट रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले होते. मात्र बंगळुरूला पोहण्याआधीच त्याचे निधन झाले.

अभिनेते बालाकृष्णदेखील खूप दुःखी झाले. बालाकृष्ण यांना जेव्हा गोकुलच्या निधनाबद्दल समजलं तेव्हा ते खूप भावनिक झाले आणि त्यांनी पत्रकार परीषद ठेवली होती. बालाकृष्ण व त्यांच्या कुटुंबाने गोकुलच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी प्रार्थना केली.

याशिवाय अनासुया भारद्वाजने देखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. अनासुया ज्या शोचं सूत्रसंचालन करते आहे त्या शोचा गोकुल भाग होती.

तिने ट्विटमध्ये लिहिलं की, आम्ही नेहमीच त्याच्यावर खूप प्रेम केले आहे. मी त्यांच्या आई वडिलांसाठी प्रार्थना करेन. ते आई वडील म्हणून जगासाठी आदर्श आहेत. त्यांनी मुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. गोकुल मी तुला खूप मिस करेन.

टॅग्स :डेंग्यूटिव्ही कलाकार