Join us

अखेर ‘चंद्रशेखर मालिका होणार बंद,तर ही नवीन मालिका येणार रसिकांच्या भेटीला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 4:01 PM

सुमारे 110 भागांच्या या मालिकेत चंद्रशेखर यांच्या जीवनाचे विविध टप्पे चित्रीत करण्यात आले होते. एका साध्या मुलाचे रुपांतर एका महान आणि कट्टर क्रांतिकारकात कसे झाले, त्याचे चित्रण करणार्‍या या मालिकेचे प्रसारण आता 17 जुलैपासून बंद होणार आहे.

क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांच्या जीवनावर आधारित ‘चंद्रशेखर’ या मर्यादित भागांच्या मालिका  प्रसारण मार्चमध्ये सुरू करण्यात आले होते. सुमारे 110 भागांच्या या मालिकेत चंद्रशेखर यांच्या जीवनाचे विविध टप्पे चित्रीत करण्यात आले होते. एका साध्या मुलाचे रुपांतर एका महान आणि कट्टर क्रांतिकारकात कसे झाले, त्याचे चित्रण करणार्‍या या मालिकेचे प्रसारण आता 17 जुलैपासून बंद होणार आहे.

आपल्यापुढील सर्व समस्या आणि अडचणींना न भिता त्यावर मात करून देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी चंद्रशेखर आझाद यांनी क्रांतीचा मार्ग कसा अनुसरला, ते अनिरुध्द पाठक यांनी निर्माण केलेल्या या मालिकेत दाखविण्यात आले होते. ही संकल्पना ‘स्टार भारत’ वाहिनीच्या ‘भुला दे डर,कुछ अलग कर’ या ध्येय धोरणास अनुसरूनच होती. या मालिकेत चंद्रशेखर यांच्या जीवनातील आजवर अज्ञात असलेल्या पैलूंचे आणि त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या बलिदानाचे दर्शन घडविण्यात आले होते.केवळ पाच महिने प्रसारित झालेल्या या मालिकेच्या निर्मितीसाठी संशोधन आणि नियोजनावर एका वर्षांपेक्षा अधिक काळ खर्च झाला होता.आपण जिवंतपणी ब्रिटिशांच्या हाती कधीही पडणार नाही, अशी प्रतिज्ञा आझाद यांनी केली होती. त्यामुळे त्यांना पकडण्यासाठी ब्रिटिश पोलिस जवळ येऊ लागले, तेव्हा त्यांनी आपल्या पिस्तुलातील अखेरच्या गोळीने स्वत:चे प्राण घेतले, हा मालिकेचा मुख्य भाग प्रेक्षकांना थक्क करून सोडले.आता या मालिकेच्या जागी ‘सावधान इंडिया’चा नवीन सिझन सुरू होणार आहे.

या मालिकेत चंद्रशेखर यांची भूमिका साकारणारा अभिनेता करण शर्मा सांगतो, “भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील काहीसे उपेक्षित राहिलेले क्रांतिकारक चंद्रशेखर यांच्या जीवनातील अनेक संघर्ष आणि समस्या आणि त्यांनी निराश न होता, त्यावर मात करण्याचा चंद्रशेखर यांची दुर्दम्य इच्छा यांचे उत्तम चित्रण करण्यात आम्हाला यश आले. आता मोठ्या जड अंत:करणाने आम्ही मालिकेला निरोप देत असलो, तरी चंद्रशेखर यांच्या चरित्रातून शिकलेले अनेक धडे आमच्या मनात सदैव राहतील.”

‘वक्त के साथ अपराधी हुआ अपग्रेड,आप भी हो जाईयें अप टू डेट’ अशी टॅगलाईन असलेल्या या 'सावधान इंडिया' शोमधून मधून आपल्याला जर आपण सतर्क नसलो तर आपल्या आजूबाजूला असलेल्या अनेक धोक्यांची जाणीव करून दिली जाणार आहे.काहीवेळा अतिशय साधारण गोष्टीसुद्धा केवळ आपण सतर्क न राहिल्यामुळे कशाप्रकारे धोकादायक बनू शकतात हे यातून आपल्याला पाहायला मिळणार आहे.