Join us  

छोटा पुढारीला बिग बॉसने दिला नारळ, घनःश्याम दरवडेचा सहा आठवड्याचा प्रवास संपला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2024 10:28 PM

छोटा पुढारी नावाने लोकप्रिय असलेला घनःश्याम दरवडे बिग बॉसमधून बाहेर (bigg boss marathi 5, ghanashyam darode, chota pudhari)

बिग बॉस मराठीमधील सहावा आठवडा सुरु झालाय. सहाव्या आठवड्यात छोटा पुढारीला बिग बॉसच्या घराबाहेर जावं लागलं आहे. या आठवड्यात एकूण सात जण नॉमिनेशनमध्ये होते. छोटा पुढारीसोबत या आठवड्यात एकूण सात सदस्य नॉमिनेट होते.  घनश्याम दरोडे ( Ghanshyam Darode), आर्या जाधव (Arya Jadhav), सूरज चव्हाण (Suraj Chavan), धनंजय पोवार (Dhananjay Powar), निक्की तांबोळी (Nikki Tamboli), अरबाज पटेल (Arbaaz Patel) आणि अभिजीत सावंत (Abhijit Sawant) हे सात सदस्या या आठवड्यात नॉमिनेट होते. त्यापैकी घनःश्याम दरवडेचा बिग बॉसमधील प्रवास संपला आहे.

असा होता छोटा पुढारीचा बिग बॉसमधील प्रवास

छोटा पुढारी अर्थात घनःश्याम दरवडे सहा आठवडे बिग बॉसच्या घरात प्रवास संपला आहे. घनःश्याम पहिले दोन आठवडे चांगला खेळत होता. रितेशभाऊंनीही त्याचं कौतुक केलं. पण नंतर मात्र घनःश्यामचा खेळ भरकटला. तो निक्की, अरबाज, वैभवच्या मागे मागे जाऊ लागला. त्यामुळे घनःश्यामचा खेळ बिघडला. त्याने अनेकदा पॅडी, धनंजय पोवार, अंकिता वालावलकर यांना उलट उत्तर दिली. त्यामुळे सर्वांना त्याच्यावर राग होता. याशिवाय काही दिवसांपूर्वी घनःश्यामने भाऊच्या धक्क्यावर टास्क खेळायला नकार दिला. त्यामुळे रितेशभाऊंनाही त्याचा राग आला होता. मी तुमच्याशी बोलणार नाही असं म्हणत रितेश घनःश्यामशी बोलत नव्हता.

घनःश्यामने जाताना सूरजला दिला पाठिंबा

घनःश्यामने बाहेर जाण्याची घोषणा झाल्यावर अरबाज, निक्की आणि सर्वांना दुःख झालं. जान्हवी सुद्धा रडत रडत बेडरुम एरियात गेली होती. घनःश्यामने जाताना वर्षा ताईंना नमस्कार केला. याशिवाय सर्वांची माफी मागितली. जाताना घनःश्यामने त्याने जमवलेली करन्सी सूरज चव्हाणच्या नावावर केली. अशाप्रकारे घनःश्याम दरवडेचा सहा आठवड्यांचा बिग बॉसचा प्रवास केला. घनःश्यामच्या जाण्याने सर्वांनाच दुःख झालेलं दिसलं.

 

टॅग्स :बिग बॉस मराठीटेलिव्हिजन