Join us

सीआयडीमधील अभिनेत्रीसोबत होते दयानंद शेट्टीचे अफेअर, सिंगल मदर बनून करतेय त्याच्या मुलीचा सांभाळ?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2020 2:30 PM

ही अभिनेत्री सीआयडीमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती.

ठळक मुद्देमोना ही एक सिंगल मदर असून तिच्या मुलींचा सांभाळ ती खूपच चांगल्या प्रकारे करते. डिसेंबर २००५ मध्ये तिने मुलीला जन्म दिला होता. मोनाचे हे मूल कोणाचे आहे यावर ती मौन राखणेच पसंत केले आहे.

कोरोना व्हायरसचा भारतात फैलाव झाल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. लोकांनी घरातच राहाण्याचे आवाहन करण्यात येत आहे. लोकांच्या मनोरंजन घरातच व्हावे यासाठी अनेक जुन्या मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस आणण्यात आल्या आहेत. आता प्रेक्षकांची आवडती मालिका सीआयडी देखील पुन्हा सुरू होणार आहे. या मालिकेतील एसीपी प्रद्युमन, दया, अभिजीत या व्यक्तिरेखांनी अनेक वर्षं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.

सीआयडी या मालिकेत दया ही व्यक्तिरेखा दयानंद शेट्टीने साकारली होती. या मालिकेमुळे त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. ही त्याची पहिलीच मालिका असली तरी त्याची व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. प्रेक्षकांच्या लाडक्या दयाविषयी काही खास गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

सीआयडी या मालिकेत सुरुवातीच्या काळात मोना आंबेगांवकरने देखील काम केले होते. तुम्हाला माहीत आहे का, या मालिकेच्या चित्रीकरणाच्या दरम्यान दया आणि मोना यांच्यात अफेअर सुरू झाले होते. मोना आणि दया यांना एक मूल देखील असल्याचे म्हटले जाते. मोनाने सीआयडी या मालिकेत तीन-चार वर्षं काम केल्यानंतर या मालिकेला रामराम ठोकला होता.

मोना ही एक सिंगल मदर असून तिच्या मुलींचा सांभाळ ती खूपच चांगल्या प्रकारे करते. डिसेंबर २००५ मध्ये तिने मुलीला जन्म दिला होता. मोनाचे हे मूल कोणाचे आहे यावर ती मौन राखणेच पसंत केले आहे. मोनाचे हे मूल दयाचे असल्याचे म्हटले जाते. दयाचे लग्न स्मिता शेट्टीशी झाले असून त्या दोघांना एक मुलगी देखील आहे. पण स्मिताशी लग्न झाल्यानंतर काही वर्षांनी दयाच्या आयुष्यात मोना आली होती. मोना आणि दयाच्या मुलीविषयी मोनाच्या इंडस्ट्रीमधील जवळच्या सगळ्या मित्रांना माहीत आहे. मोना ही सिंगल मदर असल्याने मुलीचा सांभाळ करणे तिच्यासाठी आर्थिकदृष्ट्या सोपे नाहीये. पण तरीही ती मुलीला प्रत्येक गोष्ट देण्याचा प्रयत्न करते. ती तिच्या मुलीबद्दल खूप प्रोटेक्टिव्ह असून तिच्या खाजगी आयुष्याबद्दल ती न बोलणेच पसंत करते.

मोनाने सीआयडी या मालिकेत डॉ. अंजलिका देशमुख ही व्यक्तिरेखा साकारली होती. या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांची चांगली पसंती देखील मिळाली होती. एका सामान्य मराठी कुटुंबात मोनाचा जन्म झाला होता. पण तिने तिच्या अभिनय कौशल्याने मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीत तिची एक जागा निर्माण केली. तिने आजवर धडकन, अंबर धारा यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. राणी मुखर्जीच्या मर्दानी या चित्रपटात देखील तिने काम केले होते. बिनधास्त या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे तर चांगलेच कौतुक झाले होते.

टॅग्स :सीआयडी