Join us

कलर्स मराठी वाहिनीवर एक नाही तर दोन नवीन मालिका येणार भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2023 5:45 PM

कलर्स मराठी घेऊन येत आहे अशा दोन नायिकांची कथा ज्यांचे स्वभाव, राहणीमान आणि विचार अतिशय वेगळे आहेत.

कलर्स मराठी घेऊन येत आहे अशा दोन नायिकांची कथा ज्यांचे स्वभाव, राहणीमान आणि विचार अतिशय वेगळे आहेत. एक मनमोकळी आहे तर एक बेधडक एक जरा उद्धट आहे तर एक स्पष्टवक्ती. दोघींचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि व्याख्या वेगळी आहे. जेव्हा या मुलींच्या आयुष्यात त्यांच्याहून वेगळ्या स्वभावाच्या दोन व्यक्ती येतील तेव्हा त्यांचं आयुष्य किती बदलेल ? ज्यांची ओळखच मुळात गैरसमजुती मधून झाली आहे त्यांच्यात प्रेम कसं फुलेल ? पण प्रेम अशक्य गोष्ट शक्य करू शकतं असं म्हणतात. आता द्वेषाच्या आभाळावर सावी आणि अर्जुनचं प्रेम कसं फुलेलं ? लवकरच कळेल. 

९ जानेवारीपासून सावी आणि अर्जुन या दोन धगधगत्या निखाऱ्यांच्या नातेसंबंधाची रांगडी प्रेमकथा जिथे गैरसमजाचा निखाराच पेटवणार पिरतीचा वनवा “पिरतीचा वनवा उरी पेटला” रात्री १० वाजता तर पैजेवर जग जिंकणारी 'रमा' आणि प्रेमाने जग आपलेसे करणारा 'राघव' यांची खट्याळ प्रेमाची ‘तिखटगोड’ गोष्ट “रमा राघव” रात्री ९.०० वाजता भेटीला येत आहेत.

 पिरतीचा वनवा उरी पेटला चिन्मय मांडलेकर यांनी लिहिलेल्या या कथेची निर्मिती पोतडी प्रॉडक्शन्सने केली असून सावीची भूमिका रसिका वखारकर आणि अर्जुनची भूमिका इंद्रनील कामत साकारणार आहेत. रमा राघव रोहिणी निनावे लिखित मालिकेची निर्मिती क्रिएटिव्ह ट्रान्समीडिया यांनी केली आहे. अभिनेत्री ऐश्वर्या शेटेचा तिखट अंदाज तर अभिनेता निखिल दामलेचा प्रसन्न गोडवा यामुळे खट्याळ प्रेमाची ही ‘तिखटगोड’ गोष्ट पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. या धमाल युवा जोडीबरोबरच सुहिता थत्ते,गौतम जोगळेकर,शीतल क्षीरसागर,सई रानडे,प्राजक्ता केळकर,अर्चना निपाणीकर,राजन जोशी, कांचन पगारे अशी भली मोठी स्टार कास्ट या मालिकेत असल्यामुळे ही मालिका तरुण पिढी बरोबरच आबालवृद्धांसाठी विशेष पर्वणी ठरणार आहे.

 

पैजेवर जग जिंकणारी 'रमा' आणि प्रेमाने जग आपलेसे करणारा 'राघव' यांची खट्याळ जोडी कलर्स मराठीवरच्या ‘रमा राघव’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. दोन अतिशय विरुद्ध कौटुंबिक वातावरणातून आलेल्या रमा आणि राघव यांच्यातील संघर्षाची आणि त्यातून पुढे फुलणाऱ्या प्रेमाची ही तिखट गोड गोष्ट आहे. संस्कार ,संस्कृती, परिश्रम याशिवाय आयुष्यात काही मिळत नसतं याची शिकवण अंगी भिनलेला राघव तर पैशांनी काहीही विकत घेता येतं आणि अशक्य असे काही नसते असा विचार करणारी, अहंकारी रमा यांचा सामना होतो..आणि या भांडणातूनच प्रेम फुलायला लागतं. आयुष्यात आदर्श, तत्व, मूल्य यांचं महत्व नवीन पिढीला हलक्या फुलक्या रीतिने पटवून देण्याचा प्रयत्न या मालिकेद्वारे केला जाणार आहे.

टॅग्स :कलर्स मराठी