Lai Aavdtes Tu Mala Serial : संपूर्ण महाराष्ट्र ज्या गोष्टीची वाट बघत होता त्याची आता अखेर चाहूल लागली आहे असे म्हणायला हरकत नाही. सानिका आणि सरकार यांची अनोखी लव्हस्टोरी या नव्या वर्षांत सुरु होणार आहे. आता दोघांपैकी 'लय आवडतेस तू मला' कोण कोणाला बोलणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. सरकार - सानिकाच्या या प्रेमकथेत अनेक घटना घडल्या, सरकार म्हणून 'सरकार म्हणून भिडायचं आणि 'राजा म्हणून नडायचं', असं म्हणत सरकारने साखरगावात थेट साहेबरावांच्या घरी सानिकाचा बॉडीगार्ड म्हणून एन्ट्री घेतली, कुक बनला... बॉडीगार्ड म्हणून त्याने त्याची ड्युटी उत्तमप्रकारे पार पाडली. बॉडीगार्ड असण्यासोबत तो सानिकाचा ट्रेनरदेखील बनला. सानिकाला बऱ्याच संकटांतून वाचवताना त्याला ती आवडू लागली तर सरकार बरोबरच्या नोकझोकमध्ये कधी सानिका सरकारच्या प्रेमात पडली हे तिचे तिलाच कळले नाही. कुठेतरी सरकार - सानिका दोघेही एकेमकांच्या हळूहळू जवळ येत गेले. नव्या वर्षात 'कलर्स मराठी' वाहिनीवरील 'लय आवडतेस तू मला' मालिकेत सरकार - सानिकाची लव्हस्टोरी बघायला मिळणार आहे. पण ही लव्हस्टोरी पूर्ण होऊ शकेल का? कोणत्या अडचणी येतील? त्याला सरकार - सानिका कसे सामोरे जातील? सरकारला जवळ ठेवण्यासाठी सई आखात असलेले स्वार्थी डाव सानिका कसे उलटून लावेल? हे बघणे उत्सुकतेची ठरणार आहे. पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी बघत राहा 'लय आवडतेस तू मला' पहा दररोज रात्री ९. ३० वा. आपल्या कलर्स मराठीवर!
दरम्यान, याविषयी बोलताना सानिका मोजार म्हणाली, "नव्या वर्षात सानिका आपल्या प्रेमाची कबुली देणार आहे. त्यांचं एकमेकांवर किती प्रेम आहे ते देखील सिद्ध करणार आहेत. या नव्या नात्याची नवीन गोड सुरुवात वर्षाच्या पहिल्याच आठवड्यापासून पहायला मिळणार आहे. मला खूप फॅन्सचे मेसेज येतात लाडकी जोडी, आम्हाला तुमची जोडी खूपच आवडते... मला असं सांगायला आवडेल की, आम्ही या केमेस्ट्रीसाठी खूप मेहनत घेतली आहे. आमचा ऑनस्क्रीन जो प्रवास दिसतो आहे तोच आमचा ऑफस्क्रीन देखील होता. म्हणजे अगदी नोकझोक, मग आम्ही बोलायला लागलो आणि आता आम्ही चांगले फ्रेंड्स आहोत. आम्ही एकमेकांच्या मनातलं आता ओळखू लागलो आहोत. मला एक आठवण सांगायला आवडेल आम्हांला फोटोज काढायचे होते आणि त्यात आम्हाला गुलाब हवे होते पण ते तिथे उपलब्ध नव्हते, पण फोटो तर काढायचे होते आणि आम्ही एकत्र म्हटलं पेरूसोबत काढूया फोटोज. खूप मजा येते आहे काम करायला. आम्ही एकतास आधी बसतो, तालीम करतो त्यामुळे तो सिन करायला सोपं होऊन जातं. आम्ही रॉकी और रानी मधले काही सिन बघतो, रिल्स बघतो, त्यांची केमेस्ट्री बघतो त्याची पण मदत होते. # लय आवडतेस तू मला यामधील आमच्या लव्हस्टोरीला यूनिक लव्हस्टोरी म्हणून ओळखलं जाईल, खूप सुंदर मोमेंट्स बघायला मिळतील याची खात्री आहे."
या नव्या रंजक वळणाबद्दल बोलताना सरकार म्हणजेच तन्मय जक्का म्हणाला,"आमच्या मालिकेला नवीन वर्षापासून नवी कलाटणी मिळणार आहे. सरकार आणि सानिका एकमेकांच्या प्रेमात कसे पडतात, कसे कबुली देतात हे बघायला मिळणार आहे. एकंदरीतच मजा येणार आहे. कारण सरकार राजा म्हणून गेला आहे त्याला त्याची खरी ओळख सांगता येत नाहीये. सानिका तर त्याच्या प्रेमात पूर्णपणे पडली आहे पण ते कसं पुढे जाणार, ते एकमेकांशी बोलतात कि नाही, कसं प्रपोज होणार यासगळ्या गोष्टी पहायला मिळणार आहेत. एखादी लव्हस्टोरी दाखवत असताना त्या दोन लोकांमध्ये केमेस्ट्री आणि छान प्रकारचं बॉण्डिंग लागतं. जसे कि सरकार - सानिकाचं बॉण्डिंग प्रेक्षकांना आवडतं आहे, चर्चा आहे. कारण सानिका आणि तन्मय म्हणून आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत. सिन खूपवेळा तुकड्या तुकड्यांमध्ये शूट केले जातात, पण त्यासाठी आमचे दिगदर्शक विठ्ठलसर याकडे विशेष लक्ष देतात, ते सिन सलग कसे करता येतील, त्यासाठीच पाठांतर, मोठ्या सिनमध्ये कसे ते करता येतील याची काळजी घेतली जाते. सरकारचे पात्र खूप व्हर्सटाईल आहे. माझा आयडॉल शाहरुख खान आहे. ज्या पध्द्तीने तो काम करतो सिनेमांमध्ये, परफॉर्म करतो ते वाखण्याजोगे आहे. तो कश्या डोळ्यातून जागा काढतो, डायलॉग डिलिव्हरी कशी करतो हे मी नक्कीच निरीक्षण करतो. मला खात्री आहे तुम्हाला सरकार - सानिकाची लव्हस्टोरी बघायला आवडेल."