कृतिका देसाई हे टेलिव्हिजनवरील खूप मोठे नाव आहे, तिने बुनियादी सारख्या टेलिव्हिजनच्या सुरूवातीच्या काळातील मालिकांसोबत शेकडो मालिकेत अनेक भूमिका केल्या आहेत. कोरोनाच्या काळात २०२०मध्ये लॉकडाउनच्या आधी तिचा नवरा आणि प्रसिद्ध कलाकार इम्तियाज खान यांचे हार्ट अटॅकने निधन झाले होते. त्यानंतर आता कृतिका देसाई नुकतीच नवऱ्याच्या आठवणीत भावुक झाली होती. तिने सांगितले की कसा तिचा नवरा आतादेखील तिला हिम्मत देतो. कृतिकाने हेदेखील सांगितले की, अचानक लॉकडाउनदरम्यान तिच्या नवऱ्याच्या निधनानंतर तिचे जगच बदलून गेले.
कृतिका देसाईने म्हटले की, माझ्या नवऱ्याच्या अचानक जाण्यामुळे माझे जगच पालटून गेले होते त्यानंतर काही दिवसांनी लॉकडाउन लागले. त्याचे वाईट आणि चांगले असे दोन्ही परिणाम होते. एकीकडे त्या शांततेत माझी मुलगी आयशासोबत गुपचूप राहणे ठीक होते, मला या यातनेतून बाहेर पडण्यासाठी वेळ हवा होता. तर दुसरीकडे आम्ही दोघीही एकटे राहत होतो. आमच्या दुःखाच्या काळात आम्हाला भेटायला किंवा सात्वंना देऊ शकत नव्हते. कळत नकळत आम्ही आमच्या नुकसानाची भरपाई आम्हालाच करायची होती.
पतीला गमावल्याचे दुःख सांगताना ती म्हणाली की, तिला माहित आहे की त्या दुःखातून ती कशी बाहेर पडली. हे कठीण होते, ज्याप्रकारे त्यांनी निरोप घेतला ते काळजाला भिडणारे होते. त्यांनी म्हटले की, चल कृतिका, आता मी जातो आहे आणि त्यांनी त्यांचे डोळे बंद केले. त्यावेळी त्यांनी त्यांच्या डोळ्यातून जे सांगितले त्याने आम्हाला खूप प्रेम आणि बळ मिळाले. त्यानंतर मला माझ्या मुलीसोबत पुढे जाण्यासाठी आणि मजबूत बनवण्यासाठी धैर्य मिळाले.
इम्तियाज खान प्रसिद्ध कलाकार आणि चित्रपट निर्माते होते. त्यांनी बऱ्याच हिंदी चित्रपटाची निर्मिती केली होती, ज्यात पत्थर की मुस्कान सोबत बऱ्याच चित्रपटांचा समावेश आहे. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा संबंधदेखील सिनेइंडस्ट्रीशी राहिला आहे. त्यांचा भाऊ अमदज खान आणि वडील जयंत हेदेखील प्रसिद्ध कलाकार होते.
कृतिका देसाई टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय नाव आहे. तिने बुनियाद, जमीन, आसमान, मेरे अंगने में आणि चंद्रकांता यासारख्या लोकप्रिय मालिकेत काम केले आहे. सध्या ती पंड्या स्टोर मालिकेत काम करते आहे. १९८८ साली एका मालिकेच्या शूटिंगदरम्यान इम्तियाज आणि कृतिकाने भेटले आणि हळूहळू त्यांच्यातील जवळीकता वाढली. दोघांच्या वयात खूप अंतर होते कृतिका २३ वर्षांची तर इम्तियाज ४१ वर्षांचे होते. मात्र प्रेमात वयाचे बंधन नसते. दोघांनी लग्न आहे आणि नंतर एका मुलीला दत्तक घेतले, जिचे नाव आयशा खान आहे.