छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या आयुष्यात एक काळ असा होता जेव्हा सगळीकडेच त्याच्या नावाची चर्चा होताना दिसत होती. तो यशाच्या शिखरावर पोहचला होता. २०१७-१८मध्ये कपिल शर्माचा शोदेखील बंद होता. तसेच असेदेखील वृत्त आले होते की कपिलने अचानक शूटिंग रद्द केले. असेही ऐकायला मिळाले की, त्याने शाहरुख खान आणि अजय देवगण सारख्या कलाकारांना वाट पाहायला लावली. दरम्यान, त्याचा सहकलाकार सुनील ग्रोव्हरसोबतही त्याचे भांडण झाले. कपिलसाठी हा काळ चांगला जात नव्हता.
कपिल शर्माला ते दिवस आठवतात आणि तो म्हणतो की त्याच्यासोबत काय होत आहे हे त्याला माहितही नव्हते. एक दिवस त्याने वर्तमानपत्रात बातमी वाचली की कपिल शर्मा डिप्रेशनचा शिकार झाला. तेव्हा त्याला कळले की त्याला ही समस्या आहे. त्याने नंतर सांगितले की, 'त्या वृत्तपत्राच्या लोकांना शुभेच्छा ज्यांनी मला माझे काय झाले ते सांगितले'.