प्रसिद्ध कॉमेडीयन राजीव निगमवर दुःखाचे डोंगर कोसळलंय. मुलाच्या मृत्यूने राजीव यांच्या घरात शोककळा पसरली आहे. मुलाच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत राजीव निगम यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केला. यात त्यांनी लिहिले की, 'माझ्या वाढदिवसाला हे कसलं गिफ्ट तू मला दिलंस. आज माझा मुलगा देवराज आम्हाला सोडून गेला. वाढदिवसाचा केक कापण्यापूर्वीच तो गेला.'
आपल्या आयुष्यातील कठीण प्रसंगांबद्दल बोलताना राजीवने दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या मनातील याच वेदना आणि दुःख मोकळी वाट करून दिली आहे. माझ्या कठिण काळात मला इंडस्ट्रीमधील कोणत्याही व्यक्तीने मदत केली नाही. फक्त मनीष पॉलनेच माझे दुःख समजून घेतले मला खरा आधार दिला. त्याला जसे कळाले तो त्याच क्षणी देवासारखा माझ्या मदतीला धावून आला. ‘गेल्या अडीच वर्षांपासून मी आर्थिक संकटामध्ये होतो. माझ्याकडे पैसे कमावण्यासाठी कामही नव्हते. आणि त्याच दरम्यान माझ्या मुलावर उपचार सुरू होते.’ राजीवचा मुलगा देवराज निगम हा 9 वर्षाचा होता.
मीडिया रिपोर्टनुसार, दोन वर्षांपूर्वी देवराज मित्रांसोबत खेळून घरी परतल्यानंतर आजारी पडला. त्यानंतर तो कोमात गेला. मुलाची तब्येत ढासळल्याने राजीवच्या अडचणी वाढल्या होत्या. अनेक अडचणींच्या दरम्यान त्याने आपल्या 'हर शाख पर उल्लू बैठा है' या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले होते. या चित्रपटाच्या शुटिंगनंतर राजीवने करिअरकडे दुर्लक्ष करत कुटुंबावर लक्ष केंद्रित केले होते. तो आपल्या मुलासह त्याच्या गावी कानपूर येथे राहू लागला. ऑगस्ट 2020 मध्ये वडिलांचा मृत्यू झाल्यावर राजीवला आणखी एक धक्का बसला होता.
दोन मुलाची त्याने निट काळजी घेतली.त्याच्यावर उपचार सुरू होते. 2 वर्ष देवराज व्हेंटिलेटरवर होता. पहिल्यांदाच 2018 मध्ये राजीवने आपल्या मुलाबद्दल ही माहिती देत चिंता व्यक्त केली होती. अखेर अंधेरीतल्या लोखंडवाला इथे राहत्या घरी राजीवच्या मुलाने ८ नोव्हेंबरला अखेरचा श्वास घेतला.