Raju Srivastav Heart Attack: सगळ्यांना खळखळून हसवणारे दिग्गज कॉमेडियन राजू श्रीवास्तव ( Raju Srivastav) यांना आज सकाळी हृदयविकाराचा झटका आला. सकाळी जीममध्ये वर्कआऊट करत असताना ते ट्रेडमिलवरच कोसळले. त्यांना ताबडतोब रूग्णालयात दाखल करण्यात आलं. दिल्लीच्या एम्स रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान राजू श्रीवास्तव यांचा भाऊ आणि पीआरओने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
आता त्यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, राजू श्रीवास्तव आयसीयूमध्ये आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत मात्र त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा नसल्याचं कळतंय. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर राजू श्रीवास्तव बेशुद्ध झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची एन्जिओग्राफी करण्यात आली मात्र एंन्जिओग्राफी नंतरही ते बेशुद्धच असल्याची माहिती मिळत आहे.
राजू श्रीवास्तव यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं होतं मात्र अजूनही ते बेशुद्ध असल्याचं कळत आहे. त्यांना 48 तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवलं जाणार आहे. राजू श्रीवास्तव यांचे पीआरओ अजित सक्सेना यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू श्रीवास्तव यांचे पल्स सुरळीत सुरू आहेत. डॉक्टरांनी त्यांची एंन्जिओग्राफी केली असून रिपोर्ट्स येणं बाकी आहे. राजू श्रीवास्तव यांच्या हृदयात ब्लॉकेजस असल्याची समोर आली आहे.
कॉमेडियन सुनील पाल यांनं एन्स्टाग्रामवर राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत एक व्हिडीओ शेअर केला. राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आलं हे खरं आहे. त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती ठिक असून त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी सर्वांनी प्रार्थना करा, असं त्याने व्हिडीओत म्हटलं आहे.
राजू श्रीवास्तव कॉमेडीचे बादशाह मानले जातात. राजू श्रीवास्तव यांना लहानपणापासूनच कॉमेडियन बनायचं होते आणि त्यांनी हे स्वप्न पूर्णही केलं. राजू यांनी आपल्या करिअरची सुरुवात स्टेज शोपासून केली.