कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava ) सध्या रूग्णालयात आहेत. काल जिममध्ये वर्कआऊट करत असताना राजू श्रीवास्तव ट्रेडमिलवरच कोसळले. त्यांना ताबडतोब दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आलं. राजू यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं समोर आलं. तूर्तास त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय. याचदरम्यान राजू श्रीवास्तव यांचा लहान भाऊ हा सुद्धा सध्या रूग्णालयात भरती असल्याची माहिती समोर आली आहे.
रिपोर्टनुसार, श्रीवास्तवचा धाकटा भाऊ गेल्या चार दिवसांपासून हॉस्पिटलच्या न्यूरो आयसीयूमध्ये दाखल आहे. राजू श्रीवास्तव यांच्यावर दुसऱ्या माळ्यावर तर त्याचा भाऊ तिसऱ्या माळ्यावर उपचार सुरू आहे. कुटुंबातील दोन्ही मुलं रुग्णालयात आजाराशी झुंज देत असल्याने श्रीवास्तव कुटुंब हवालदिल झालं आहे.
राजू श्रीवास्तव अद्यापही चिंताजनक दिल्लीच्या एम्स रूग्णालयात राजू श्रीवास्तव यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, त्यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार त्यांना एम्समध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्यानं सुरूवातीला त्यांना इमर्जन्सी मेडिसिन डिपार्टमेंटमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. परंतु नंतर त्यांना सीसीयूमध्ये हलवण्यात आलं. जिममध्ये ट्रेडमिलवर धावत असताना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर राजू श्रीवास्तव बेशुद्ध झाले होते. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची अॅन्जिओग्राफी करण्यात आली मात्र अॅन्जिओग्राफी नंतरही ते बेशुद्धच असल्याची माहिती समोर आली होती. रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार अॅन्जिओग्राफिमध्ये एका ठिकाणी 100 टक्के ब्लॉक सापडल्याचं सांगण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
राजू श्रीवास्तव कॉमेडीचे बादशाह मानले जातात. राजू श्रीवास्तव यांना लहानपणापासूनच कॉमेडियन बनायचं होते आणि त्यांनी हे स्वप्न पूर्णही केलं. राजू यांनी आपल्या करिअरची सुरुवात स्टेज शोपासून केली. राजू श्रीवास्तव राजकारणातही सक्रिय आहेत. ते भाजपचे नेते आणि उत्तर प्रदेश चित्रपट विकास परिषदेचे अध्यक्ष आहेत.