Join us  

'कपिल शर्मा शो'ला टक्कर देणारा 'आपका अपना झाकीर' एका महिन्यातच बंद पडला, मोठं कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2024 12:09 PM

'आपका अपना झाकीर' हा शो सुरू झाला होता. पण, आता एका महिन्याच्या आतच झाकीरला गाशा गुंडाळावा लागला आहे. त्याचा शो बंद होणार असल्याची चर्चा आहे. 

झाकीर खानचे स्टँडअप कॉमेडी शो जगभरात गाजतात. उत्तम विनोदबुद्धीच्या जोरावर तो चाहत्यांचं मनोरंजन करतो. स्टँडअप कॉमेडियन असलेल्या झाकीरचे जगभरात फॅन्स आहेत. अलिकडेच सोनी टीव्हीवर झाकीरचा 'आपका अपना झाकीर' हा शो सुरू झाला होता. झाकीरला पुन्हा टीव्हीवर पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक होते. पण, आता एका महिन्याच्या आतच झाकीरला गाशा गुंडाळावा लागला आहे. त्याचा शो बंद होणार असल्याची चर्चा आहे. 

द कपिल शर्मा शो या शोच्या जागी झाकीर खानचा नवा शो सुरू झाला होता. १० ऑगस्टला 'आपका अपना झाकीर' या शोचा पहिला भाग प्रसारित करण्यात आला होता. आता मात्र एका महिन्यातच हा शो बंद करण्याचा निर्णय चॅनेलने घेतला आहे. टिआरपी आणि रेटिंग नसल्याने हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे झाकीर खानबरोबरच त्याच्या चाहत्यांनाही मोठा झटका बसला आहे. 

टाइम्स नाऊने दिलेल्या रिपोर्टनुसार, 'आपका अपना झाकीर' शोचे ६ एपिसोड शूट केले गेले होते. आणि हे सगळे एपिसोड प्रसारित करण्यात आले आहेत. त्यानंतर या शोचे एपिसोड शूट झाले की नाही याबाबत काहीच माहिती नाही. पण, रेटिंग चांगलं मिळत नसल्याने आणि टीआरपीच्या शर्यतीतून बाहेर पडल्याने हा शो बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकारसेलिब्रिटी