Join us  

'कॉमेडीची बुलेट ट्रेन' पोहोचली साता-यात !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2016 2:08 PM

कॉमेडीची बुलेट ट्रेन दिवाळीच्या निमित्ताने थेट पोहोचली साता-यात, होय नेहमी छोट्या पडद्यावर आपल्या चाहत्यांना कॉमेडीने हसून हसून लोटपोट करणा-या ...

कॉमेडीची बुलेट ट्रेन दिवाळीच्या निमित्ताने थेट पोहोचली साता-यात, होय नेहमी छोट्या पडद्यावर आपल्या चाहत्यांना कॉमेडीने हसून हसून लोटपोट करणा-या विनोदवीरांनी यंदा साता-यात जाऊन त्यांच्या चाहत्यांसाठी एक खास मनोरंनाची ट्रीटच दिली. यावेळी विनोद वीरांनी एक खास धमाल स्कीट सादर केले. स्कीटमध्ये साता-यातील खाद्यपदार्थ, गडकिल्ले, लोकप्रिय स्थळ, तेथील रांगडेपणा या सा-या गोष्टींचा समावेश होता. त्यामुळेच आपल्या लाडक्या वीनोदवीरांची एक झलक पाहण्यासाठी या कार्यक्रमाला सातारकरांनीही प्रचंड गर्दी केली होती. यावेळी मानसी नाईकने फ्लॉवर एक्टर सादर केला तर दिपाली सैय्यदने ठसकेबाज लावणीने सातारकरांची मने जिंकली. दिवाळीच्या निमित्ताने केलेला हा कार्यक्रम विशेष ठरला कारण प्रथमच कॉमेडीच्या माध्यमातून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. विनोदाचा दर्जा आणि सामाजिक भान यांचा उत्तम समतोल राखला गेला आहे जे खूप महत्वाचे असून प्रेक्षकांचे प्रेम आणि उदंड प्रतिसाद हे आमच्या यशाचे गणित आहे असे अंशुमन विचारेने यावेळी आपले मत मांडले, तसेच चाहत्यांच्या सहकार्यानेच  कॉमेडीची बुलेट ट्रेन हा कार्यक्रम ३०० भाग पूर्ण करत आहे. सातारकरांना खास हसविण्यासाठी आम्ही आलो आणि आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळाला. सातारकर म्हणजे कंदी पेढ्यासारखे असतात इथल्या माणसांमधला गोडवा, प्रेम आणि रांगडेपणा आम्ही आमच्या स्कीटमध्ये आणण्याचा प्रयत्न केला आणि तो सातारकरांना आवडला. असेच प्रेम आमच्यावर करत रहा हीच इच्छा असल्याचे विशाखा सुभेदारने सांगितले.