Join us

'ठरलं तर मग'चे २०० भाग पूर्ण, सिद्धीविनायक मंदिरात बाप्पाचं दर्शन घेत टीमने साजरा केला आनंद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 12:13 PM

Tharala Tar Mag : 'ठरलं तर मग' मालिकेने नुकताच २०० भागांचा टप्पा पार केला. या निमित्ताने मुंबईतील सुप्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरात ठरलं तर मग मालिकेच्या संपूर्ण टीमने बाप्पाचं दर्शन घेतलं.

स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग मालिकेने नुकताच २०० भागांचा टप्पा पार केला. या निमित्ताने मुंबईतील सुप्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरात ठरलं तर मग मालिकेच्या संपूर्ण टीमने बाप्पाचं दर्शन घेतलं. या खास प्रसंगी निर्माते सुचित्रा बांदेकर, सोहम बांदेकर आणि आदेश बांदेकर उपस्थित होते.

ठरलं तर मग मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या कुटुंबाचा भाग बनलं आहे. याच प्रेमापोटी सातत्याने नंबर वन रहाण्याचा मान ठरलं तर मग मालिकेला मिळाला आहे. प्रेक्षकांचं हे प्रेम आणि बाप्पाचा आशीर्वाद असाच पुढच्या प्रवासात मिळावा ही भावना संपूर्ण टीमने या खास प्रसंगी व्यक्त केली. 

सायलीसोबत अर्जुनचं पुन्हा लग्न लावणारठरलं तर मग मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे. मालिकेत पूर्णा आजीला सायलीबद्दल आपुलकी वाटू लागली आहे. त्यामुळे आता ती सायली आणि अर्जुनचे पुन्हा लग्न लावायचे आहे. सायली-अर्जुनचं नातं स्वीकारण्याबाबत पूर्णा आजी कल्पनाला सांगते. कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज आल्याने अर्जुन-सायलीही खोलीबाहेर येतात. तेव्हा त्यांना कल्पना आणि पूर्णा आजी बोलत असल्याचे दिसते. याआधीही कल्पनाने अनेकदा पूर्णा आजीला अर्जुन सायलीचे नाते स्वीकारण्याबाबत सांगितलेले असते, मात्र ते कायम पूर्णा आजीने दूर्लक्षित केलेले असते. आता पूर्णा आजी म्हणते की, 'मी सायलीचा राग राग करत होते, ते तन्वीच्या प्रेमापोटी. प्रतीमाला दिलेलं वचन आठवून मी सायलीला दूर लोटत होते. मात्र जे सतत दिसत राहतंय ते कधीपर्यंत नाकारू?'पूर्णा आजी पुढे म्हणते की, 'सायली या घरातील सर्वांच्या आनंदासाठी धडपडते, पण मी तिला कधीच माफ केले नाही. तरीही तिने माझा वाढदिवस माझ्या मनासारखा साजरा केला, तेही तिला कोणी न सांगता.'  तिने क्रेडिट कार्ड प्रकरणात अस्मिताला पाठीशी घातल्याचंही पूर्णा आजी आठवते. पूर्णा आजीचे हे बोल ऐकून सायली-अर्जुनलाही आनंद होतो. मात्र दुसऱ्याच क्षणी अर्जुनला टेन्शन येतं की, सायलीला पूर्णा आजीने स्वीकारले तर काय होणार? पूर्णा आजी म्हणते की सुभेदारांच्या सूनेत हवे ते सगळे गुण सायलीत आहेत. मात्र आजीला तन्वीच्या भविष्याचीही चिंता असते. पूर्णा आजीने यावर असा मार्ग शोधलेला असतो की तन्वीसाठी योग्य स्थळ शोधून तिचं लग्न लावून देणार आणि त्यानंतर सुभेदारांच्या चालीरितींप्रमाणे दणक्यात अर्जुन-सायलीचंही लग्न लावणार. पूर्णा आजीचा हा निर्णय ऐकून कल्पना तर सुखावते पण अर्जुन-सायलीच्या पायाखालची जमीन सरकते.