Join us

Confirmed...! हा अभिनेता साकारतोय मि. बजाजची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 06:00 IST

 तब्बल ६ वर्षांनी छोट्या पडद्यावर हा अभिनेता कमबॅक करतो आहे.

 

स्टार प्लसवरील ‘कसौटी जिंदगी के’ मालिकेत आता तब्बल १८ वर्षांनंतर मि. बजाज या गाजलेल्या व्यक्तिरेखेची एन्ट्री होते आहे. २००१ मध्ये या व्यक्तिरेखेने या मालिकेत खूपच उलथापालथ घडवून आणली होती. या मालिकेचे यंदा नव्या संचात प्रसारण सुरू झाल्यापासून मि. बजाजची भूमिका कोणता कलाकार साकारणार, हे जाणून घेण्याबद्दल प्रेक्षकांच्या मनात अतिशय उत्सुकता होती आणि अनेक कलाकारांच्या नावांची चर्चाही होत होती. पण आता ही प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. कारण करण सिंग ग्रोव्हर मि.बजाजच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे.

करण सिंग ग्रोव्हर हा आता सहा वर्षांनी टीव्हीवर परतत असून मिस्टर ऋषभ बजाजच्या भूमिकेद्वारे तो प्रेक्षकांना नक्कीच खिळवून ठेवताना दिसणार आहे.

नव्या संचातील मालिकेत करण सिंग ग्रोव्हर हा एकमेव कलाकार असा आहे, जो पूर्वीच्या मालिकेतही होता. तेव्हा त्याने श्री. बजाजच्या जावयाची भूमिका साकारली होती. मालिकेची निर्माती एकता कपूरचे करण सिंग ग्रोव्हरशी विशेष नाते असून तिच्या मते तोच या भूमिकला पूर्ण न्याय देऊ शकेल.

रोनित रॉयने पूर्वी साकारलेल्या मि. बजाजच्या भूमिकेने प्रेक्षकांवर केलेली मोहिनी आजही कायम असून त्याबद्दल रोनितची सार्वत्रिक प्रशंसा होत होती. आता ही आव्हानात्मक भूमिका उभी करण्यासाठी करणसिंह ग्रोव्हर याच्यापेक्षा दुसरा कोणताही कलाकार न्याय देऊ शकणार नाही.

आता आगामी आठवड्यांमध्ये मि. बजाजच्या व्यक्तिरेखेचा या मालिकेत प्रवेश होईल. त्यामुळे प्रेक्षक पुन्हा एकदा या भूमिकेवर फिदा होतील.

टॅग्स :कसौटी जिंदगी की 2रोनित रॉयकरण सिंग ग्रोव्हर