अमिताभ बच्चन यांच्या KBC 16 ची सध्या चांगलीच चर्चा आहे. केबीसीचा नवीन सीझन पुन्हा एकदा अमिताभ बच्चन होस्ट करत आहेत. अमिताभ बच्चन पुन्हा एकदा त्यांच्या सूत्रसंचालनाने KBC 16 गाजवत आहेत. अमिताभ यांच्या KBC 16 च्या या पर्वात नवनवीन स्पर्धक सहभागी होत आहेत. या स्पर्धकांना बिग बींकडून आव्हानात्मक प्रश्न विचारले जात आहेत. या प्रश्नांची उत्तर जाणून घेताना आपल्याही ज्ञानात भर पडत असते. केबीसीच्या नवीन पर्वात एका सदस्याला ५० लाखांचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी स्पर्धकाने उत्तर येत नसल्याने खेळ सोडला.
हा होता ५० लाखांचा प्रश्न
KBC 16 मध्ये सुधीर वर्मा नावाचा स्पर्धक सहभागी झाला. DL ED हे शिक्षण सुधीर वर्माने घेतलं आहे. सुधीरने KBC 16 मध्ये चांगला खेळ दाखवला. पण ५० लाखांचा प्रश्न मात्र त्याला खेळता आला नाही. सुधीर वर्माला प्रश्न विचारण्यात की, हेनरी वाल्टर्स द्वारा 1830 की जनगणना का विषय कौन सा शहर था, जो ब्रिटिश भारत में किसी शहर की पहली पूर्ण जनगणना में से एक थी? A) मुंबई B) ढाका C) म्हैसूर D) लाहोर. या प्रश्नाचं उत्तर न देता आल्याने सुधीर वर्माने खेळ सोडला.
हे आहे या प्रश्नाचं उत्तर
या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन B ढाका आहे. सुधीर वर्मा यांनी योग्य उत्तर माहित नसल्याने खेळ सोडला. परंतु अमिताभ यांनी त्यांच्या खेळाचं कौतुक केलं. २५ लाख ही विजयी रक्कम घेऊन सुधीर वर्मांनी खेळ सो़डला. KBC 16 काहीच दिवसांपूर्वी झालं असून आशा आणि आकांशा या टॅगलाईनखाली या पर्वाची सुरुवात झालीय. अमिताभ बच्चन यांच्या खुमासदार सूत्रसंचालनाने पुन्हा एकदा हे पर्व प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतंय.