पोरस मधील समीक्षा सहकलाकारांसाठी बनली कूक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2018 7:30 AM
पोरस ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. या मालिकेतील ...
पोरस ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा या प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. या मालिकेत समीक्षा क्वीन ऑलिम्पिकच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या मालिकेतील समीक्षाची भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली आहे. प्रेक्षकांप्रमाणे या मालिकेच्या टीमची देखील समीक्षा लाडकी बनली आहे. समीक्षा ही खूपच चांगली कूक असून ती तिच्या सहकलाकारांसाठी काही ना काही बनवून आणत असते. तिने नुकतेच तिच्या मालिकेच्या संपूर्ण टीमसाठी घरी बनवलेले पौष्टिक लाडू आणले होते. हे लाडू सगळ्यांना प्रचंड आवडले. या लाडूची खासियत म्हणजे, ते बदाम, अक्रोड यांसारख्या अनेक ड्रायफ्रूटचा वापर करून बनवले होते. समीक्षा नेहमीच बाहेरचे खाणे टाळते. त्यामुळे तिला भूक लागल्यावर दुसरे काहीही खाण्यापेक्षा ती हे लाडू खाते. तिच्यामते घरी बनवलेला आहार हा पौष्टिक असून तो शरीरासाठी अतिशय चांगला असता. ती सांगते, "आपले आरोग्य हीच खरी संपत्ती आहे, हे खूप जुने बोध वाक्य आहे आणि ते अगदी खरं आहे. आपल्याला घरी अतिशय छान पदार्थ करता येतात. आपल्याकडे अनेक पर्याय असतात. त्यामुळे मी कधीच बाहेर खाणे पसंत करत नाही आणि त्यामुळेच हे लाडू मी करत असते, ते मी सारखेच आणि खूप प्रमाणात करून ठेवते आणि हे जेव्हा माझ्या सहकलाकारांना कळले, तेव्हापासून ते देखील माझ्या लाडवावर ताव मारतात. तेव्हापासून मी खूपच जास्त प्रमाणात लाडू बनवते आणि आता तर माझे सहकलाकार मी बनवलेल्या लाडूचा अख्खा बॉक्सच त्यांच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना देऊ लागले आहेत आणि ते लाडू देखील ते मलाच करायला लावतात. हे लाडू बनवायला मला जवळजवळ एक तास लागतात. हे लाडू तब्येतीसाठी खूपच चांगले असतात. त्यामुळे ते प्रत्येकाने खाल्ले पाहिजे असे मला वाटते. त्यामुळे मी देखील आवडीने माझ्या सहकलाकारांना बॉक्सभर लाडू बनवून देते. Also Read : आदित्य रेडजीने पोरस या मालिकेसाठी केले मुंडन