Join us

Corona Lock Down: जय श्रीराम संपूर्ण कुटुंब रंगलंय रामायणात, अरूण गोविल यांचा हा फोटो ठरतोय सर्वात खास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 11:08 AM

रामायण टीव्हीवर पाहात पुन्हा तोच काळ अनुभवणे हा एक वेगळाच अनुभव सध्या अरूण गोविल घेत आहेत. 

सोशल मीडियावर सध्या कोरोनामुळे लॉक डाऊन काळात सेलिब्रेटी काय काय करत आहेत. याच्या अपडेसच्या त्यांच्या चाहत्यांना एका क्लिकवर मिळत आहेत. तसेही आपले आवडते कलाकार त्यांच्या खाजगी आयुष्यात कसा वेळ घालवतात हे जाणून घेण्याची नेहमीच इच्छा असते. अशातच आता २१ दिवसांचा लॉक डाउन आहे त्यामुळे सेलिब्रेटी कधी नव्हे ते काम करत आपले फोटो त्यांच्या चाहत्यांसह शेअर करण्याची एकही संधी सोडत नाही. अशातच अभिनेते अरूण गोविल यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर सा-यांचे लक्ष वेधून घेत आहे. अरूण गोविल संपूर्ण कुटुंबासह रामायण पाहात असल्याचे या फोटोत पाहायला मिळत आहे. श्रीलेखा गोविल असे त्यांच्या पत्नीचे नाव आहे. अरुण आणि श्रीलेखा यांना दोन मुले आहेत. मुलाचे नाव अमल आणि मुलीचे नाव सोनिका गोविल आहे.

हा फोटो चाहत्यांच्या पसंतीतस उतरत असून कमेंटस आणि लाईक्सचा वर्षाव करत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुळात हा फोटो इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहेत. अरूण गोविल यांना रामायणमध्ये साकारलेली रामची भूमिका आजही चाहत्यांच्या मनात तशीच कायम आहे.  ३३ वर्षानंतरही रामायण आणि मालिकेतील कलाकारांची आजही जादू कायम आहे. त्यामुळे आजही अरूण गोविल  टीव्हीचे राम म्हणूनच ओळखले जातात. 

रामायणमुळे जिथे जिथे अरूण गोविल जायचे तिथे तिथे रसिक त्यांच्या पायाल स्पर्श करत आशिर्वाद घेत. रामायण सुरू होण्याआधी लोक टीव्ही समोर अगरबत्ती लावत त्यांची पुजा करायचे असेही अनेक किस्से रामायणमुळे अरूण गोविल यांना आले आहेत. अनेकदा त्यांनी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याविषयी सांगितले आहे.  राम या भूमिकेमुळे त्यांना सतत पौराणिक भूमिकाच ऑफर व्हायच्या आणि एकाच पठडीतले काम अरूण यांना करायचे नव्हते. त्यामुळे कधीच ते रामच्या छवीतून बाहेर आलेच नाहीत. 

पौराणिक भूमिका त्यांना करायच्या नव्हत्या. परिणामी या अभिनय क्षेत्रापासून ते लांब गेले. अरूण गोविल यांचे त्यानंतर फारसे रसिकांना दर्शन घडले नाही. केवळ पाहुण्या कलाकाराच्या भूमिकाच त्यांच्या वाट्याला आल्या. त्यामुळे त्यांना देशभरातील प्रेक्षकांचे प्रेम मिळाले. पण याच मालिकेने त्यांच्या करिअरला मात्र कायमचा ब्रेक लावला. नक्कीच या भूमिकेने कालाकार म्हणून अरूण गोविल यांना अधिक समृद्ध केले आहे. म्हणूनच जेव्हा स्वतःला टीव्हीवर पाहात पुन्हा तोच काळ अनुभवणे हा एक वेगळाच अनुभव सध्या अरूण गोविल घेत आहेत. 

टॅग्स :रामायण