वाढत्या प्रादुर्भावामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारतात 21 दिवसांच्या लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनमुळे एंटरटेन्मेंट इंडस्ट्री पूर्णपणे ठप्प झाली आहे. सध्या छोट्या पडद्यावर प्रसारित होणा-या मालिकांचे शूटिंग थांबल्यामुळे घरी असलेल्या फॅन्सला जोरदार धक्का बसला आहे. अशा परिस्थितीत भारत सरकारने 90 च्या दशकातील प्रसिद्ध कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे, दूरदर्शनच्या नॅशनल चॅनलवर 28 मार्चपासून 'रामायण', 'महाभारत', 'ब्योमकेश बक्षी' आणि 'सर्कस' हे शो पुन्हा सुरू करण्यात आले आहेत.
कोरोनामुळे सर्वत्रच लॉक डाउन करण्यात आल्यामुळे लोकांनी घरातच बसावे. घराबाहेर पडू नये म्हणून रसिकांच्या मनोरंजनासाठी आता अनेक गाजलेल्या मालिका पुन्हा सुरू करण्यात आल्या आहे. यात रामानंद सागर यांचे 'रामायण' आणि बी.आर. चोप्रा यांचे 'महाभारत' नव्वदीच्या काळातील लोकांचा आवडता आता पुन्हा सुरू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे जेव्हा लॉकडाउनमुळे शहर ओसाड पडले आहेत, सोशल मीडियावर लोकांनी हे दोन्ही कार्यक्रम परत टेलीकास्ट करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता आणखी काही मालिका सुरू होणार आहेत. यांत रामायण, महाभारत नंतर शक्तीमान देखील पुन्हा परतणार आहे.
नव्वदच्या दशकात छोट्या पडद्यावर विविध मालिकांनी रसिकांची मनं जिंकली. आजही या मालिका रसिकांच्या मनात घर करुन आहेत. याच अनेक लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे शक्तीमान. भारताचा पहिला सुपरहिरो असलेला शक्तीमान बच्चेकंपनीसह सा-यांनाच भावला. सा-यांचा लाडका, शत्रूचा कर्दनकाळ आणि भारतीय छोट्या पडद्यावरील पहिलावहिला सुपरहिरो... 1990 च्या दशकात छोट्या पडद्यावर पंडित गंगाधर विद्याधर मायाधर ओमकारनाथ शास्त्री या फोटो पत्रकाराची एंट्री झाली. तुमच्या आमच्यासारखा एक सामान्य माणूस. मात्र ज्यांना मनःशांती आणि ध्यानधारणा करुन सुपरपॉवर मिळवली आणि तो बनला शक्तीमान...
शत्रूचा विनाश करण्यासाठी तो अवतरला. 1990 च्या दशकातल्या मुलांचा तो लाडका बनला. आता हाच शक्तीमान पुन्हा एकदा येत आहे. शक्तीमानची भूमिका साकारणा-या मुकेश खन्ना यांनी याची माहिती दिली आहे. त्यामुळं आता पुन्हा एकदा ऐकू येणार सॉरी शक्तीमान.