‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करतेय. चित्रपटातील सर्व व्यक्तिरेखांनी रसिकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. हॅप्पी गो लकी स्टोरीलाइन असलेली ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. प्रेक्षक उत्सुकतेने नव्या एपिसोडची वाट पाहत असतात. इतकेच नाही तर प्रसारीत झालेले एपिसोड पुन्हा पुन्हा पाहत असतात. पण गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरसमुळे सरकारने अनेक निर्बंध जारी केले आहेत. कोरोनाचा धोका लक्षात घेता चित्रपट व मालिकांचे शूटींगही रद्द करण्यात आले आहे. पण ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे मेकर्स मात्र थांबण्याच्या मन:स्थितीत नाहीत. होय, कदाचित त्याचमुळे शोचे मेकर असित मोदी यांनी ट्वीट करून सरकारला शूटींग सुरु ठेवू देण्याची विनंती केली आहे.
‘सर, आम्हाला या सर्कुलरबद्दल कुठलीही स्पष्ट माहिती मिळात नाहीये. अचानक फिल्मसिटीने आम्हाला शूटींगची परवानगी नाकारली. सेटवर स्वच्छता ठेवण्यापासून तर छोट्या युनिटसोबत काम करून आम्ही सर्व निर्देशांचे काटेकोरपणे पालन करत आहोत. कृपया आम्हाला उद्यापर्यंत शूटींगची परवानगी द्यावी,’ असे टिष्ट्वट असित मोदी यांनी केले आहे.
याशिवाय आणखी एक ट्वीट त्यांनी केले आहे. ‘सर, आम्हाला कृपया या सर्कुलरबद्दल मार्गदर्शन करा. काय फिल्मसिटीतील सर्व शूटींग थांबले आहे? एमआयडीटी, कारखाने, शासकीय कार्यालये, खासगी कार्यालये आजपासून बंद आहेत? आम्ही सरकारने दिलेल्या सर्व निर्देशांचे पालन करत आहोत. काय आम्ही उद्यापर्यंत कमी लोकांसोबत काम करू शकतो?’ असे त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
कोरोनाचा धोका वाढला असतानाही असित मोदी शूटींग करायला उतावीळ आहेत, असे यातून दिसतेय. अर्थात ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या चाहत्यांनी मात्र त्यांना असे न करण्याचा सल्ला दिला आहे. ‘आधी आपल्या लोकांची काळजी घ्या. शूटींग होत राहिल. शक्य असेल तर सर्वांना सुट्टी द्या. कारण लोक दूरून कामावर येतात,’ अशा आयशाच्या अनेक प्रतिक्रिया चाहते यावर देत आहेत.