Join us

SHOCKING! ‘मेरे साई’ व ‘बी. आर. आंबेडकर’च्या सेटवर कोरोनाची धडक; टीव्ही इंडस्ट्रीत खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2020 10:57 AM

‘एक महानायक डॉ. बी. आर. आंबेडकर’ मालिकेतील या कलाकाराला कोरोनाची बाधा

ठळक मुद्दे दोन मालिकांच्या सेटवर कोरोनाने  शिरकाव केल्याने तूर्तास टीव्ही इंडस्ट्रीत खळबळ माजली आहे.

महाराष्ट्रात कोरोना रूग्णांचा आकडा धडकी भरवणारा असताना आता या व्हायरसने टीव्ही इंडस्ट्रीतही धडक दिली आहे. होय, मेरे साई  आणि डॉ. बी. आर. आंबेडकर या दोन मालिकेच्या सेटवरील लोकांना कोरोनाने ग्रासले आहे. तूर्तास या दोन्ही मालिकांचे शूटींग थांबवण्यात आले आहे. लॉकडाऊन काळात मालिका व चित्रपटांचे शूटींग ठप्प पडले होते. तीन महिन्यांच्या कालावधीनंतर सरकारने काही अटी व शर्तींसह शूटींगला परवानगी दिली आणि शूटींग सुरु झाले. मात्र सर्वोतोपरी काळजी घेऊनही कोरोनाने या दोन मालिकांच्या सेटवर शिरकाव केला.

  दोन मालिकांच्या सेटवर कोरोनाने  शिरकाव केल्याने तूर्तास टीव्ही इंडस्ट्रीत खळबळ माजली आहे. ‘एक महानायक डॉ. बी. आर. आंबेडकर’आणि ‘मेरे साई’या दोन मालिकांच्या सेटवरील कलाकारांनाच कोरोनाची बाधा झाली असल्याने चिंता वाढल्या आहेत.

‘एक महानायक डॉ. बी. आर. आंबेडकर’ या मालिकेत आंबेडकरांच्या वडिलांची भूमिका साकारणारे अभिनेते जगन्नाथ निवंगुणे यांना कोरोनाची लागण झाली आहे. संबंधित मालिकेच्या प्रॉडक्शन हाऊसने या बातमीला दुजोरा दिला आहे. सध्या जगन्नाथ यांची प्रकृती स्थिर असून, लवकरच ते बरे होऊन परत येतील, असा विश्वास प्रॉडक्शन हाऊसने व्यक्त केला आहे. जगन्नाथ हे मराठी अभिनेते आहेत.  अनेक मालिका, सिनेमांमधूनही ते झळकले आहेत. संपूर्ण काळजी घेऊनही त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे सेटसह अनेकजण बुचकळ्यात पडले आहेत. जगन्नाथ निवंगुणे सध्या वरळी इथे उपचार घेत असून ते सुखरूप आहेत. ते क्वारंटाईन असूनच डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली असल्याचे कळते.  त्यांच्यात कोरोनाची कुठलीही लक्षणे नव्हती. तरीही त्यांची टेस्ट केली असता ती पॉझिटीव्ह आढळली. यामुळे गेल्या दोन दिवसांपासून या मालिकेचे शूटिंग बंद करण्यात आले आहे.‘मेरे साई’ मालिकेच्या सेटवरच्या एका कर्मचा-याला कोरोना झाला. प्रकृती बिघडल्यानंतर या कर्मचा-याची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्याची टेस्ट पॉझिटीव्ह आढळली.

जगन्नाथ निवंगुणे म्हणाले, 

कोरोनाची लागण झाल्याच्या वृत्ताला अभिनेते निवंगुणे यांनी स्वत: दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, शूटींग सुरु झाल्यावर मी माझ्या स्वत:च्या गाडीने सेटवर यायचो. सर्व दक्षता घेऊन चित्रिकरण करून माझ्या गाडीनेच घरी जायचो. सेटवर कमीतकमी लोकांच्या संपर्कात येण्याचा मी पूरेपूर प्रयत्न केला. पण तरीही हे कसे काय झाले ते कळायला मार्ग नाही. तूर्तास मी वरळीत इथे सुखरूप आहे. डॉक्टर माझी काळजी घेत आहेत. काळजीचे काहीही कारण नाही.

टॅग्स :मेरे साई मालिकाकोरोना वायरस बातम्या