चंदीगड : दूरचित्रवाणी वाहिनीवरील अभिनेत्री मुनमुन दत्ता ऊर्फ बबिता यांचा अटकपूर्व जामीन अर्ज हरयाणातील हिसारच्या विशेष न्यायालयाने फेटाळला आहे. दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत(एससी-एसटी)दत्ता यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. मुनमुन दत्ता यांनी ९ मे, २०२१ रोजी यूट्यूबवर जारी एका व्हिडीओत अनुसूचित जाती-जमातींबद्दल आक्षेपार्ह भाष्य केले होते. याप्रकरणी दलित अधिकार कार्यकर्ते रजत कलसन यांनी त्यांच्याविरुद्ध १३ मे रोजी तक्रार दिली होती.
Munmun Dutta: तारक मेहतामधील बबिता मुनमुन दत्ता हिला कोर्टाचा धक्का, त्या प्रकरणात अटकपूर्व जामिनाची याचिका फेटाळली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 6:00 AM