Join us

क्राइम पेट्रोलमध्ये पोलीस अन् खऱ्या आयुष्यात हातात बेड्या! प्रेमात वेडी झाली अभिनेत्री, बॉयफ्रेंडच्या भाच्याचंच केलं अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 11:20 AM

'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्रीच्या हातून गुन्हा! प्रेमात झाली इतकी वेडी, बॉयफ्रेंडच्या भाच्यालाच केलं किडनॅप

क्राइम पेट्रोल फेम टीव्ही अभिनेत्री शबरीन हिला रविवारी पोलिसांनी अटक केली. पालघरमध्ये पोलिसांनी शबरीनच्या हातात बेड्या ठोकल्या. क्राइम पेट्रोल सारख्या मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्रीकडूनच मोठा गुन्हा घडला आहे. शबरीनने तिच्या प्रियकराच्याच भाच्याचं अपहरण केलं होतं.बॉयफ्रेंडच्या कुटुंबीयांनी लग्नास नकार दिल्याने शबरीनने हे कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे.  नेमकं काय प्रकरण आहे ते जाणून घेऊया. 

शबरीन बृजेश सिंहबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. मात्र जात वेगळी असल्याने बृजेशच्या कुटुंबीयांना त्यांचं नातं मान्य नव्हतं. त्यामुळे त्यांच्या नात्याला बृजेशच्या घरच्यांचा विरोध होता. याच कारणामुळे बृजेशच्या प्रेमात वेड्या झालेल्या शबरीनचा त्याच्या कुटुंबीयांवर राग होता. यातूनच तिने बृजेशच्या भावाच्या मुलाचं अपहरण केलं. शनिवारी शाळेतून सकाळी ११ वाजता शबरीनने बृजेशच्या भाच्याचं अपहरण केलं. प्रेमात वेड्या झालेल्या शबरीनला आपण काय करतोय, याचं भानही राहिलं नाही. 

वरिष्ठ पोलीस अधिकारी जयराज रानावाने यांनी एएनआयशी बोलताना म्हटलं की, "शबरीन बृजेशच्या प्रेमात सगळं विसरून गेली. क्राइम पेट्रोल सारख्या क्राइम सीरिज आणि वास्तविक घटनांवर आधारित असलेल्या मालिकेत काम करूनही तिने हे कृत्य केलं".  या घटनेचा पोलीस अधिक तपास करत असून यात तिच्या प्रियाकराचाही सहभाग आहे का, याचा शोध सुरू आहे.

टॅग्स :क्राइम पेट्रोलगुन्हेगारीटिव्ही कलाकार