Join us

सावधान रहे, सतर्क रहे! नव्या थरारक कथांसह 'क्राईम पेट्रोल' मालिका पुन्हा होतेय सुरु, प्रोमो रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 17:03 IST

'क्राईम पेट्रोल' मालिकेचा नवीन सीझन सुरु होणार आहे. या नव्या सीझनचा प्रोमो भेटीला आला आहे

'क्राईम पेट्रोल' मालिकेचा (crime petrol serial) स्वतःचा एक चाहतावर्ग आहे. ही मालिका पाहण्यासाठी रात्री सहकुटुंब सहपरिवार अनेक जण टीव्हीसमोर बसलेले असायचे. अशातच 'क्राईम पेट्रोल' मालिकेच्या नवीन सीझनबद्दल अपडेट समोर आली आहे. अनुप सोनी (anup soni) यांनी भूमिका असलेल्या 'क्राईम पेट्रोल' मालिकेचा नवीन प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे २६ नवीन मर्डर मिस्ट्रीसह ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज आहे.'क्राईम पेट्रोल' पुन्हा होतंय सुरुसोनी टीव्हीने 'क्राईम पेट्रोल' मालिकेच्या नवीन सीझनबद्दल अपडेट देणारा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केलाय. या प्रोमोमध्ये अनुप सोनी पुन्हा एकदा होस्टच्या रुपात दिसत आहेत. २६ मर्डर मिस्ट्रीज, २६ नव्या केस आणि २६ नवे एपिसोड्स असं कॅप्शन देऊन 'क्राईम पेट्रोल'चा हा नवीन प्रोमो शेअर करण्यात आलाय. एकूणच अनुप सोनी पुन्हा एकदा तडफदार अंदाजात 'क्राईम पेट्रोल'चं सूत्रसंचालन करताना दिसणार आहेत. मालिकेचा नवीन प्रोमो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.कधी सुरु होणार 'क्राईम पेट्रोल'चा नवीन सीझन'क्राईम पेट्रोल' मालिकेचा नवीन सीझन लवकरच भेटीला येणार आहे. अजूनतरी 'क्राईम पेट्रोल'च्या नवीन सीझनची तारीख समोर आली नाहीये. 'क्राईम पेट्रोल'च्या नवीन सीझनमध्ये कोणत्या रंजक कथा दिसणार, याचा थोड्याच दिवसांमध्ये उलगडा होईल. दरम्यान चाहत्यांनी 'क्राईम पेट्रोल'चा नवीन सीझन पाहण्यासाठी उत्सुकता दर्शवली आहे. 'क्राईम पेट्रोल'चे याआधीचे सर्व सीझन चांगलेच गाजले.   

टॅग्स :क्राइम पेट्रोलअनुप सोनीबॉलिवूडटेलिव्हिजनगुन्हेगारी