Join us

Cyclone Tauktae : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या सेटलाही चक्रीवादळाचा तडाखा, क्रू मेंबर्सची पळापळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 18:09 IST

Cyclone Tauktae Video: ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ चा अभिनेता करण कुंद्राने याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.

ठळक मुद्देये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत अलीकडेच अभिनेता करण कुंद्राची एन्ट्री झाली आहे. तो या मालिकेत रणवीर नावाचे पात्र साकारतो आहे.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौत्के चक्रीवादळाचा महाराष्ट्राच्या किनारपट्टीला जोरदार फटका बसला. या वादळाने मुंबई ठप्प झाली. आज रात्री 8 ते 11 च्या दरम्यान हे चक्रीवादळ गुजरातला धडकणार आहे. तत्पूर्वी गुजरातच्या अनेक भागात वादळी वा-यासह मुसळधार पावसाला सुरुवात झालीये. काही टीव्ही मालिकांनाही याचा फटका बसला आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या हिंदी मालिकेच्या सेटवर चक्रीवादळाने दाणादाण उडवली.

कोरोनामुळे महाराष्ट्रात लॉकडॉऊनच सुरू आहे. त्यामुळे अनेक टीव्ही शो व मालिकेचा सेट  अन्य राज्यांत हलवण्यात आले आहेत. गुजरातच्या वापी शहरात सध्या अनेक टीव्ही मालिकांचे शूटींग सुरु आहे. मात्र तौत्के वादळामुळे येथेही अनेक मालिकांच्या चित्रीकरणाचाही खोळंबा झालेला पाहायला मिळाला. सेटचे प्रचंड नुकसान झाले. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेच्या सेटलाही वादळी वारा व मुसळधार पावसाचा जोरदार फटका बसला.

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ चा अभिनेता करण कुंद्राने याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत सेटवरच्या लोकांची पळापळ स्पष्ट दिसतेय. पळा पळा म्हणून अनेक क्रू मेंबर्स पळत आहेत. काही जण सामान सुरक्षित जागी पोहोचवण्याचे काम करत आहेत. सध्या ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या सेटवरचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत अलीकडेच अभिनेता करण कुंद्राची एन्ट्री झाली आहे. तो या मालिकेत रणवीर नावाचे पात्र साकारतो आहे. शिवांगी जोशी आणि मोहसीन खान या मालिकेत लीड रोलमध्ये आहेत.

टॅग्स :ये रिश्ता क्या कहलाता हैतौत्के चक्रीवादळ