Join us  

अमरावती आहे का? डेझी शाहच्या शेतातील फोटोंवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स, शिव ठाकरे म्हणतो...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 3:19 PM

शिव ठाकरेच्या शेतात डेझी शाह?

बिग बॉस अमरावतीचा वाघ शिव ठाकरे (Shiv Thakare) आणि बॉलिवूड अभिनेत्री, डान्सर डेझी शाह (Daisy Shah) एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा अनेकदा होतात. अद्याप दोघांनीही या बातमीला दुजोरा दिलेला नाही. मात्र चाहत्यांचं दोघांकडेही लक्ष असतं आणि ते दोघांना अनेकदा कात्रीक पकडतात. नुकतंच डेझी शाहने शेतात फोटोशूट केलं. यावर चाहत्यांनी अमरावतीला आल्या का मॅडम अशा कमेंट्स केल्या आहेत. तसंच शिवनेही तिच्या फोटोंवर कमेंट केली आहे.

डेझी शाहने कालच तिचे काही क्युच फोटो शेअर केलेत. पांढऱ्या-गुलाबी रंगाच्या चुडीदार ड्रेसमध्ये तिने शेतात हे फोटोशूट केलं आहे. या लूकमध्ये ती अगदी गोड दिसत आहे. तसंच शेतात तिने छान पोज दिल्या आहेत. डेझीने याचं लोकेशन मात्र दिलेलं नाही. यावर चाहत्यांनी तिची चेष्टा केली आहे. 'हे तर शिवच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यातलं शेत आहे', 'अमरावतीला आल्या वाटतं मॅडम', 'हे अमरावतीच आहे शिवने तिला नागरपूरवरुन पिक केले', 'शिव भाऊच्या शेतात वहिनी' अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. At this vwery moment असं कॅप्शन तिने फोटोंना दिलं आहे. 

शिवने यावर कमेंट करत लिहिले, 'अच्छा ठीक आहे, काळजी घे जय हिंद, जय महाराष्ट्र, आनंदी राहा बाकी मेसेजवर बोलतो.' अशी मजेशीर कमेंट त्याने केली आहे.

शिव ठाकरे 'खतरो के खिलाडी सिझन 13' मध्ये सहभागी झाला होता. यामध्ये अनेक टीव्ही कलाकारही होते. याच सेटवर त्याची आणि डेझीची ओळख झाली. त्यांना अनेकदा सोबत बघितलं गेलं. पण दोघांनी नेहमीच या फक्त अफवा असल्याचं स्पष्ट केलं आहे.

टॅग्स :शीव ठाकरेडेझी शहासोशल मीडियारिलेशनशिपटिव्ही कलाकार