Join us

दलजीत कौरला पतीच्या गर्लफ्रेंडनेच दिली धमकी, अभिनेत्रीनेही दिलं जशास तसं उत्तर; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 12:46 PM

दलजीत पतीविरोधात कायदेशीर लढाई लढत आहे. दरम्यान निखिलच्या गर्लफ्रेंडने दलजीतलाच धमकी दिली आहे.

टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर (Dalljiet Kaur) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. पहिला घटस्फोट झाल्यानंतर तिला दुसऱ्या लग्नातही अपयश आलं आहे. दुसरा पती निखिल पटेलने (Nikhil Patel) तिला लग्नानंतर धोका दिला. ती पतीसोबत केनियाला शिफ्ट झाली आणि निखिलचे दुसऱ्याच मुलीसोबत संबंध असल्याचं समोर आलं. आता दलजीत पतीविरोधात कायदेशीर लढाई लढत आहे. दरम्यान निखिलच्या गर्लफ्रेंडने दलजीतलाच धमकी दिली आहे.

दलजीत कौर अनेकदा सोशल मीडियावर पोस्ट करत निखिल पटेलचा पर्दाफाश करत आहे. यामुळे निखिलच्या प्रतिमेलाही धक्का लागत आहे.  त्यानेही तिच्याविरोधात केस दाखल केली आहे. दलजीतने अनेक सोशल मीडियावर पोस्टमध्ये निखिलच्या गर्लफ्रेंडचा उल्लेख केला आहे. त्यामुळे आता त्याच्या गर्लफ्रेंडनेच दलजीतला थेट धमकी दिली आहे. टाइम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, निखिलची गर्लफ्रेंड सफीनाने दलजीतला मेसेज केला. माझ्याविषयी सोशल मीडियावर बोलू नको. तू आमचं वैवाहिक आयुष्य खराब करत आहेस. मी माझ्या पतीसोबत आनंदी आहे. जर तू आमच्याविरोधात बोलणं बंद केलं नाही तर तुझी सायबर पोलिसमध्ये तक्रार करेन."

यावर दलजीतनेही तिला तिच्याच भाषेत उत्तर दिलं आहे. ती लिहिते, "तुला जे करायचं ते कर. माझ्याकडे सोशल मीडियावर लिहिलेल्या सर्व गोष्टींचे सबळ पुरावे आहेत. तू माझ्यावर केसही करु शकते. " दलजीतने टाइम्स नाऊला हे कन्फर्म केलं आहे. तसंच सध्या मला माझ्या सुरक्षेची चिंता वाटत असल्याचंही ती यावेळी म्हणाली. 

निखिल पटेल आणि दलजीत कौर दोघांचं हे दुसरं लग्न आहे. दलजीतचं पहिलं लग्न शालीन भनोटशी झालं होतं. त्यांना एक मुलगाही झाला. मात्र नंतर दलजीतने शालीनवर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप लावले आणि तिने घटस्फोट घेतला. तर दुसरीकडे निखिलला पहिल्या लग्नापासून दोन मुली आहेत. 

टॅग्स :दलजीत कौरटिव्ही कलाकारलग्नघटस्फोट