Join us

दलजीतविरोधात निखिल पटेलची कायदेशीर कारवाई, पत्नीला थेट इशारा देत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 16:14 IST

दलजीत कौरचे दुसऱ्या पतीसोबतचे वाद चव्हाट्यावर

'इस प्यार को क्या नाम दूँ' हिंदी मालिकेतून लोकप्रिय झालेली टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर (Dalljiet Kaur) सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. पहिल्या घटस्फोटानंतर दलजीतने कौरने निखिल पटेलशी (Nikhil Patel) लग्न केले होते. आपल्या लेकासह ती केनियाला शिफ्ट झाली होती. लग्नाचे, हनिमूनचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्टही केले होते. मात्र आता दलजीतने पतीवर विवाहबाह्य संबंधांचे आरोप लावले. लग्नानंतर १० च महिन्यात ती लेकाला घेऊन पुन्हा माहेरी आली. आता पत्नीच्या आरोपांवर निखिल पटेलने सडेतोड उत्तर दिलं असून एक प्रकारे तिला इशाराच दिला आहे.

निखिल पटेलने दलजीत कौरला नोटीस पाठवली असून त्याने कायदेशीर कारवाई सुरु केली आहे. दलजीतने लावलेले आरोप खोटे आहेत. तो म्हणाला, "जगात आणि भारतात ऑनलाइन सुरक्षा कायद्यात खूप अंतर आहे आणि लोक प्रसिद्धीसाठी याचा फायदा उचलतात. संबंधित लोकांच्या सहमतीशिवाय त्यांचे फोटो, व्हिडिओ शेअर करतात, विशेषत: मुलांच्या प्रकरणात जे समाजात नेहमीच कमजोर असतात आणि ज्यांना नेहमीच कायद्याच्या सुरक्षेची गरज असते."

निखिल पटेलच्या टीमक़डून असेही सांगण्यात आले आहे की, "दलजीतने जूनमध्ये केनियाला येऊन स्वत:चं राहिलेलं सामान घेऊन जावं. नाहीतर ते दान करण्यात येईल कारण सामान इथे ठेवण्यात आता काहीच अर्थ नाही. याआधीही बऱ्याचदा सामान घेऊन जाण्यास सांगूनही तिने नेलेलं नाही. तसंच यापुढे निखिल कोणत्याही प्रकारची मानहानी सहन करणार नाही. जर दलजीतने अशाच प्रकारे आरोप सुरु ठेवले तर तिच्याविरोधात कडक कारवाई केली जाईल."

टॅग्स :दलजीत कौरघटस्फोटसोशल मीडियाटिव्ही कलाकार