Join us

दलजीतचा दुसरा पती गर्लफ्रेंडसह मुंबईत आला, अभिनेत्रीने फोटो शेअर करत व्यक्त केलं दु:ख

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 11:49 IST

दलजीत कौरनेच निखिल मुंबईत आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. म्हणाली...

अभिनेत्री दलजीत कौरच्या  (Dalljiet Kaur) आयुष्यात वादळ आलं आहे. पहिल्या घटस्फोटानंतर आता दुसऱ्या लग्वनातही तिचा विश्वासघात झाला आहे. केनियाचा पती निखिल पटेलने (Nikhil Patel) दलजीतला धोका दिला असून लग्नानंतर १० महिन्यातच ती भारतात परत आली. दोघांचा घटस्फोटही झाल्याची चर्चा आहे. दलजीतने निखिलवर विवाहबाह्य संबंधांचे आरोप लावले जे आता खरे निघाले आहेत. कारण निखिल त्याची गर्लफ्रेंड सफीना नजरसह मुंबईत आला आहे. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

दलजीत कौरनेच निखिल मुंबईत आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हे पाहून ती प्रचंड दुखावली आहे. आज निखिलचा वाढदिवस असून दलजीतने त्यांच्या लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत. गेल्या वर्षी बायको म्हणून तिने त्याचा वाढदिवस रोमँटिक पद्धतीने साजरा केला होता. तर यावर्षी चित्र बदललं आहे. दलजीतने लांबलचक पोस्ट शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

दुसरीकडे निखिल गर्लफ्रेंड सफीन नजरसोबत दिसत आहे. त्याने ताजलँड हॉटेलमध्ये एन्ट्री केली. यावेळी निखिल सफीनासोबत रोमँटिकही होत होता. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. दलजीतने स्वत:च ती पोस्ट रिशेअर केली.

दलजीतला नेटकऱ्यांनी कमेंट करत धीर दिला आहे. मात्र ज्या लग्नात सर्वांचे आनंदाश्रू होते त्या आठवणी विसरुन कसं Move On करायचं असा प्रश्न दलजीत विचारत आहे. रडून रडून तिची अवस्था वाईट झाली आहे. नेटकऱ्यांनी कमेंटमध्ये निखिलला खडेबोल सुनावले आहेत

टॅग्स :दलजीत कौरसोशल मीडियाघटस्फोटटिव्ही कलाकार