मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर मालिकेच्या माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन करत आहेत. मालिकेशिवाय सोशल मीडियावरही त्या सक्रीय असतात. सोशल मीडियावर त्यांच्या फॉलोअर्सचीही संख्या प्रचंड मोठी आहे. दिवसेंदिवस त्यांच्या चाहत्यांच्याही संख्येत वाढ होत आहे.
व्हिडीओ फोटो आणि सेटवरचे किस्से शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असतात. त्यांचा एक भन्नाट डान्स व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.सुप्रिया यांचा हा डान्सचा व्हिडीओ सध्या फॅन्समध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. सुप्रिया जे काही करतात त्यात काही ना काही खासियत असतेच. व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे याच गोष्टीची प्रचिती येते.
डान्स करताना सुप्रिया यांच्यामधली एनर्जी पाहून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल. सुप्रिया सध्या 'किस रंग प्यार के ऐसे भी' आणि 'जननी' या दोन हिंदी मालिकेत झळकत आहे. मालिकेतल्या त्यांच्या भूमिकेलाही रसिकांची विशेष पंसती मिळते. मराठी, हिंदी सिनेमांसह मालिका तसंच रियालिटी शोमध्ये आपली जादू दाखवली आहे.
सुप्रिया पिळगांवकरने आपल्या करिअरची सुरुवातच मोठ्या पडद्यावरच्या गुड गर्लच्या भूमिकेतून केली. त्याच रुपात ती रसिकांसमोर आली..डायरेक्टर प्रोड्यूसर बरोबरच प्रेक्षकांनाही सुप्रियात एक आदर्श स्त्रीच दिसली..आणि याच चांगुलपणाचा परिणाम तिच्या भूमिकेवरही पडला. त्याचमुळे की काय सुप्रियाला फक्त चांगल्या इमेज असलेल्याच भूमिका मिळाल्या.मोठ्या पडद्यापासून ते छोट्या पडद्यावरच्या भूमिकादेखील सुप्रियाने चांगल्या पद्धतीने निभावल्या. इतकचं नाही तर सासू- सूनांच्या तू-तू मैं मैंवर असलेल्य़ा या मालिकेतूनही सुप्रियानं रसिकांना खळखळून हसवलं.
इन्सटाग्राम अकाउंटवर नजर टाकली असता आपल्याला कळून येईल की सुप्रिया आपल्या फिटनेसबाबतही जागृक आहेत. फिट राहावं यासाठी फार लक्ष देतात. त्यामुळेच की काय सुप्रिया यांचे सौंदर्य आजही अबाधित आहे. वयाच्या ५३ व्या वर्षीही तरुणींनाही लाजवेल इतक्या त्या सुंदर दिसतात.
या वयातही स्वत:ला खूप चांगले फिट ठेवले आहे. त्यांच्या फोटोंकडे पाहिले असता आपल्याला त्यांच्या वयाचा अंदाजा लावणे मुश्किल आहे. त्याचे विविध अंदाजातील फोटो पाहून चाहतेही लाईक्स आणि कमेंट्स देत भरपूर पसंती देतात.