Join us

'डान्स प्लस ७'चं दमदार कमबॅक, रेमो डिसुझासोबत हे कोरिओग्राफर दिसणार परीक्षकांच्या खुर्चीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 17:59 IST

Dance Plus 7 : 'डान्स प्लस ७' शो प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे.

८ वर्षांपूर्वी ‘डान्स प्लस’ (Dance plus 7) सुरू झाल्यापासून, देशात सर्वाधिक वाखाणल्या गेलेल्या आणि प्रेक्षकांचे उदंड प्रेम लाभलेल्या नृत्याच्या ‘रिएलिटी शो’पैकी एक म्हणून या कार्यक्रमाने विशेष स्थान संपादन केले आहे. आता, हा दर्जेदार रिएलिटी शो सातव्या सीझनसह प्रेक्षकांच्या भेटीकरता सज्ज झाला आहे. नृत्याचे अनोखे आविष्कार सादर करणाऱ्या आणि प्रेक्षकांना सहभागी करून घेण्याची उत्तम शैली संपादन केलेल्या या कार्यक्रमाचा आनंद लुटण्यासाठी रसिकांमध्ये पुन्हा उत्सुकता पाहायला मिळत आहे.

डान्स प्लस प्रोचे प्रेक्षक पुन्हा एकदा या डान्स रिएलिटी शोच्या धमाकेदार परफॉर्मन्ससाठी उत्सुक आहेत. रेमो डिसूझा आणि इतर कॅप्टन, शक्ती मोहन, पुनित पाठक आणि राहुल शेट्टी यांच्या मजेदार केमिस्ट्रीसह, डान्स प्लस शो आता छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. या वर्षी डान्स प्लसचा नवीन सीझन भारतीय नृत्य प्रकारातील अस्सल बारकावे साजरे करण्यासाठी सज्ज झाला आहे. डान्स प्लसच्या नवीन प्रोमोसह, महान मायकेल जॅक्सनला अनोखी श्रद्धांजली अर्पण करणे आणि भारतीय संस्कृती प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्याचा या शोचा उद्देश आहे.

स्टार प्लसवरील या आयकॉनिक शोचा वारसा पुढे चालू ठेवत, यापूर्वी कधीही न पाहिलेले रोमांचक प्रोडक्शन पाहण्यासाठी सज्ज व्हा. हा शो स्टार प्लसवर १६ डिसेंबरपासून शनिवार आणि रविवारी संध्याकाळी ६ वाजता प्रसारित होईल आणि डिस्ने प्लस हॉटस्टारवर उपलब्ध असेल. 

टॅग्स :रेमो डिसुझाडान्स प्लस 4