Join us

गौतमी पाटीलचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल; सोशल मीडियावर चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 15:17 IST

Gautami patil: मध्यंतरी गौतमीचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

गौतमी पाटील (gautami patil)  हे नाव सध्या कोणासाठीच नवीन राहिलेलं नाही. गेल्या काही महिन्यांमध्ये गौतमी सातत्याने चर्चेत येत आहे.  अनेकांनी तिच्या लावणी करण्याच्या पद्धतीवर आक्षेप घेतला. तर, काहींनी तिला पाठिंबा दिला. यामध्येच मध्यंतरी तिचा एक कपडे बदलतानाचा व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाला होता.त्यामुळे या ना त्या कारणामुळे ती सातत्याने चर्चेत येत आहे. विशेष म्हणजे या मधल्या काळात तिचा चाहतावर्ग कमालीचा वाढला असून ती या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. त्यातच आता तिचा एक नवीन व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

गौतमी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे तिचा चाहतावर्ग सुद्धा तितकाच अफाट आहे. इन्स्टाग्रामवर तिचे जवळपास १ मिलिअन फॉलोअर्स आहेत. त्यामुळे ती सतत चाहत्यांसाठी काही ना काही फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. यात नुकताच तिने एक छानसा व्हिडीओ पोस्ट केला आहे.गौतमीने एक रिल व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती झाडाच्या फांद्यांसोबत खेळत आहे. सोबतच ती अत्यंत साध्या लूकमध्ये दिसत असल्यामुळे अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. तसंच तिच्या एक्स्प्रेशन्सवर पुन्हा नेटकरी घायाळ झाले आहेत.

दरम्यान, गौतमी सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील प्रसिद्ध डान्सर म्हणून ओळखली जाते. बऱ्याचदा राजकीय कार्यक्रम, वाढदिवस यांसारख्या ठिकाणी तिच्या डान्सचं आयोजन केलं जातं. इतकंच नाही तर ती एका कार्यक्रमासाठी १ ते २ लाख रुपये मानधन घेत असल्याचं म्हटलं जातं. गौतमी लवकरच 'घुंगरु' या मराठी सिनेमामध्येही झळकणार आहे. 

टॅग्स :गौतमी पाटीलटेलिव्हिजनसेलिब्रिटी