Join us

"दाऊद इब्राहिमही मला घाबरतो...", 'बिग बॉस १८'चा हा सदस्य घरात करतोय दादागिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 1:57 PM

Bigg Boss 18 gunaratna sadavarte : बिग बॉस १८च्या घरात वकिल गुणरत्न सदावर्ते सहभागी झाले आहेत. ते घरात प्रत्येक गोष्टींवर घरातील सदस्यांचा वाद घालताना दिसत आहेत. दरम्यान आता त्यांनी शोमध्ये धक्कादायक खुलासा केला आहे.

'बिग बॉस १८' (Bigg Boss 18) शो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. शो सुरू होऊन काही दिवस उलटले आहेत. या शोमधील स्पर्धकांना वादही होताना दिसत आहे. यंदाच्या सीझनमध्ये प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) सहभागी झाले आहेत. ते घरातील इतर स्पर्धकांसोबत वाद घालताना दिसत आहेत. दरम्यान आता त्यांनी बिग बॉसच्या घरात धक्कादायक विधान केले आहेत. 

अलिकडेच प्रसारीत झालेला बिग बॉस १८च्या एपिसोडमध्ये पाहायला मिळाले की, बिग बॉसने घरातील तजिंदर आणि हेमाला तुरूंगातून बाहेर काढण्यासाठी पर्याय दिला. त्यांनी सांगितले की, आणखी एक स्पर्धक आणि चाहतला आता तुरुंगात राहावे लागेल. चाहतचा जोडीदार निवडण्याचा अधिकार टीव्ही कलाकार करणवीर मेहरा, ईशा सिंग आणि अविनाश मेहरा यांना देण्यात आला. तिघांनीही एकमताने गुणरत्न सदावर्ते यांची निवड केली. हे ऐकून वकील संतापले आणि तुरुंगात जाण्यास नकार दिला आणि बिग बॉसला स्वतःचा निर्णय दिला. 

 पण मी जेलमध्ये जाणार नाही

सदावर्ते यांनी कोणत्याही किंमतीत तुरुंगात जाणार नाही अशी धमकी दिली आणि बिग बॉसला आपला निर्णय बदलण्यास सांगितले. मतमतांतरे व्यक्त करत गुणरत्न ओरडायला लागले आणि म्हणाले, 'बघा, मी जाणार नाही, आता शो सोडेन, नॉमिनेट होतो पण जेलमध्ये जाणार नाही. नाही जायचंय, फक्त संपवा. प्रश्न छेडछाडीचा नाही, भूमिकेचा आहे, कोर्टातही आमची अशीच भूमिका आहे. सरकार मला घाबरते. दाऊद इब्राहिम मला घाबरतो. मी तुरुंगात जाणार नाही. जा, जा, जा...'

हे स्पर्धक आहेत घरात 'बिग बॉस १८'च्या घरात विवियन डीसेना, शहजादा धामी, मुस्कान बामने, रजत दलाल, शिल्पा शिरोडकर, श्रुतिका अर्जुन, एलिस कौशिक, चुम दरंग, न्यारा बॅनर्जी, अरफीन खान आणि त्याची पत्नी सारा अरफीन खान आहेत. पुन्हा एकदा सलमान खान हा शो होस्ट करत आहे. हा शो तुम्ही कलर्सवर रात्री १० वाजता आणि वीकेंड का वार रात्री ९.३० वाजता पाहू शकता. हे भाग जिओ सिनेमावर पाहायला मिळेल.

टॅग्स :बिग बॉसगुणरत्न सदावर्ते