Join us  

ऐश्वर्या रायच्या खांद्यावर डोकं ठेवून ढसाढसा रडली होती दयाबेन, दिशा वकानीचा Unseen Photo व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 12:35 PM

अभिनेत्री दिशा वकानी(Disha Vakani)ला प्रेक्षक तारक मेहता का उल्टा चश्मा(Tarak Mehta Ka Ulta Chashma)मधील दयाबेन या पात्रामुळे ओळखतात. तिने सिनेमातही काम केले आहे.

अभिनेत्री दिशा वकानी(Disha Vakani)ला प्रेक्षक तारक मेहता का उल्टा चश्मा(Tarak Mehta Ka Ulta Chashma)मधील दयाबेन या पात्रामुळे ओळखतात. तिने सिनेमातही काम केले आहे. २००८ साली जोधा अकबर चित्रपटात दिशा वकानी ऐश्वर्या राय(Aishwarya Rai)सोबत झळकली आहे. तिने या चित्रपटात राणी जोधाची साथी माधवीची भूमिका केली आहे. सिनेमाच्या कथेनुसार, जोधा (ऐश्वर्या राय)ला लग्नानंतर अकबर (हृतिक रोशन) सोबत त्याच्या महलात जायचं असते. दरम्यान आता या चित्रपटातील एक फोटो व्हायरल होतो आहे, ज्यात दिशा वकानी ऐश्वर्यासोबत दिसत आहे.

जोधा अकबर सिनेमातील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे, ज्यात दिशा ऐश्वर्याच्या खांद्यावर डोके ठेवून रडताना दिसतेय. या फोटोत त्या दोघीही लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. जोधा अकबर हा चित्रपट रोमँटिक ड्राम होता जो मुघल सम्राट अकबर आणि त्यांची पत्नी जोधा यांच्या प्रेमकहाणीवर आधारीत आहे. ऐश्वर्या आणि दिशाच्या या फोटोला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

आजही प्रेक्षक 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये दिशा वकानीच्या पुनरागमनाची वाट पाहत आहेत. ऑगस्ट २०२३ मध्ये ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत असित मोदी म्हणाले होते, 'शोचे प्रेक्षक त्यांच्या आवडत्या दयाबेनच्या शोमध्ये परत येण्याची वाट पाहत आहेत. भूमिकेसाठी कोणाची तरी निवड करणे सोपे नाही आणि दिशाची भूमिका साकारणे कोणत्याही अभिनेत्रीसाठी आव्हान असेल. या भूमिकेसाठी आपल्याला एका उत्तम कलाकाराची गरज आहे.

टॅग्स :दिशा वाकानीऐश्वर्या राय बच्चन