Join us

'रंग माझा वेगळा'मधील दीपाने 'सामी सामी' गाण्यावर केला डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 19:33 IST

रंग माझा वेगळा (Rang Maza Vegla)मधील दीपाच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील रंग माझा वेगळा (Rang Maza Vegla) मालिका मराठी टेलिव्हिजनवरील टॉपची मालिका आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील सर्व पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत दीपाची भूमिका अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने साकारली आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळत आहे. दरम्यान नुकताच दीपा उर्फ रेश्मा शिंदे (Reshma Shinde) हिने इंस्टाग्रामवर पुष्पा चित्रपटातील सामी सामी (Sami Sami Song) या गाण्यावर डान्स केला आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. 

खरेतर दीपा म्हणजेच रेश्मा शिंदे टिपक्यांची रांगोळी या मालिकेतील स्पेशल एपिसोडमध्ये दिसणार आहे. दीपा आणि टिपक्यांची रांगोळी मालिकेतील सुमीने पुष्पा चित्रपटात रश्मिका मंदानावर चित्रीत झालेले गाणे सामी सामीवर डान्स केला आहे. या डान्सचा व्हिडीओ रेश्माने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यांच्या या डान्सला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहे.

या व्हिडीओवर एका युजरने लिहिले की, दीपा आणि सुमी फुल ऑन फायर, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले की, परफेक्ट जमले तर काही युजर्सनी खूप छान अशी कमेंट केली आहे. 
टॅग्स :रेश्मा शिंदेस्टार प्रवाह