Join us

रंग माझा वेगळामध्ये दीपाच्या आयुष्याला मिळणार कलाटणी, जाहिरातीनंतर आता मिळाली ही मोठी ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 19:21 IST

मराठी टेलिव्हिजनवर गेल्या बऱ्याच दिवसांपासून टीआरपीमध्ये रंग माझा वेगळा (Rang Maza Vegla) मालिका पहिल्या स्थानावर आहे. आता या मालिकेत दीपाला एक मोठी ऑफर मिळालीय.

मराठी टेलिव्हिजनवर गेल्या बऱ्याच दिवसांपासून टीआरपीमध्ये रंग माझा वेगळा (Rang Maza Vegla) मालिका पहिल्या स्थानावर आहे. या मालिकेतील ट्विस्टमुळे प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळताना दिसते आहे, आता या मालिकेत दीपाला एक मोठी ऑफर मिळालीय.

रंग माझा वेगळा मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे. दिपाला फोन करून ऑफिसमध्ये मीटिंग आहे सांगून बोलवलं जातं. अँड कंपनीचा माणूस ऑफिसमध्ये आलेला असतो. तो सांगतो अँड कॅम्पनला जगभरात खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आमच्या एजन्सी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. आमच्या एजन्सी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून दीपाची नियुक्त करण्यात आल्याचा तो सांगतोय.  दीपा आता इंटरनॅशनल फेअरनेस क्रीमची मॉडेल बनणार आहे. इथवर पोहोचण्याआधी दीपाला काही अडथळे पार करावे लागले. आता सगळीकडे दीपा आणि दीपिकाचे पोस्टर लागणार आहेत. 

काही दिवसांपूर्वी मालिकेत पाहायला मिळाले की, सौंदर्या इनामदारांची मोठी कंपनी आहे, ज्यात ब्युटी प्रॉडक्ट बनवले जातात. नवीन संकल्पना घेऊन इनामदारांची कंपनी नवीन प्रॉडक्ट लाँच करणार आहे आणि यासाठी त्यांना नवा फेस हवा आहे. या जाहिरातीसाठी त्यांनी दीपाची निवड केली. या जाहिरातीच्या शूटिंगसाठी दीपा एक सुंदर साडी नेसून तयार होते. दीपासोबत या जाहिरातीत कार्तिकची मुलगी दीपिका देखील झळकली आहे. 

टॅग्स :स्टार प्रवाह