Join us

'मैं भी अर्धांगिनी' मालिकेत दीपशिखा नागपाल साकारणार नकारात्‍मक भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2019 7:15 AM

'मैं भी अर्धांगिनी' मालिकेत स्‍टाइल आणि दृष्टिकोनाबाबत अग्रस्‍थानी असलेली दीपशिखा मालिकेमध्‍ये निलांबरीची भूमिका साकारणार आहे.

बॉलिवुड अभिनेत्री, दिग्‍दर्शक, लेखिका, गायिका असलेली दीपशिखा नागपाल ही क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ती कोणत्‍याही नकारात्‍मक भूमिकेला ग्‍लॅमरस लुक देऊ शकते. विविध शैलींमधील विविध भूमिका साकारलेली दीपशिखाने आतापर्यंत साकारलेल्‍या वैविध्‍यपूर्ण भूमिकांमधील नकारात्‍मक शैलीसाठी ओळखली जाते. हीच शैली लहान पडद्यावर सादर करत दीपशिखा &TVवरील नवीन काल्‍पनिक मालिका 'मैं भी अर्धांगिनी'मधील आणखी एका नकारात्‍मक भूमिकेतून रसिकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे.

स्‍टाइल आणि दृष्टिकोनाबाबत अग्रस्‍थानी असलेली दीपशिखा मालिकेमध्‍ये निलांबरीची भूमिका साकारणार आहे. निलांबरी ही जगाला साधीभोळी वाटत असली तरी ती खूपच चालाक आहे. सर्व मालमत्‍ता व संपत्‍तीवर तिचाच हक्‍क असावा अशी तिची इच्‍छा आहे. तिची नजर फक्‍त संपत्‍तीवर आहे. ती तिच्‍या कुटुंबाच्‍या मनामध्‍ये प्रबळ स्‍थान निर्माण करण्‍यासाठी तिचा हा स्‍वभाव व गोड-कडू संवादांचा वापर करते. 

स्‍वत: स्‍वतंत्र व स्‍टायलिश असलेली दीपशिखा आणि तिच्‍या भूमिकांमध्‍ये भरपूर साम्‍य आहे. दीपशिखा म्‍हणाली, ''मला वाटते माझी ही उत्‍तम शैली आहे. म्‍हणूनच महिलांमधील खंबीर भूमिका साकारताना खूप सोपे जाते. मी भूमिकेचे लुक व स्‍टाइलवर प्रभावित झाले आहे. या मालिकेमधील भूमिका स्‍वत:ला अगदी नाविन्‍यपणे सादर करते आणि म्‍हणूनच मी ही भूमिका साकारण्‍यासाठी खूपच उत्‍सुक आहे. तसेच मला आनंद होत आहे की, आम्‍ही चित्रीकरणासाठी मुंबईच्‍या व्‍यस्‍त जीवनामधून जयपूरला जात आहोत. मी त्‍या शहराचा अनुभव घेण्‍यास खूपच उत्‍सुक आहे.'' 

विविध नकारात्‍मक भूमिका साकारलेली अभिनेत्री अशा भूमिका साकारायला कधीच नकार देत नाही. ती तिच्‍या या नकारात्‍मक अभिनयासह प्रेक्षकांना आकर्षून घेते. नकारात्‍मक भूमिका साकारण्‍याची आवड असण्‍याबाबत बोलताना अभिनेत्री म्‍हणाली, ''सुरुवातीला मला नकारात्‍मक भूमिका आवडायच्‍या नाहीत. पण अभिनेत्री म्‍हणून अनुभव मिळाल्‍यानंतर मला समजले की नकारात्‍मक भूमिकाच अधिक आव्‍हानात्‍मक असतात आणि प्रेक्षकांना देखील अशा भूमिका सर्वाधिक आवडतात. या भूमिकांमधील अनपेक्षित स्‍वभावाने नेहमीच प्रेक्षकांमध्‍ये उत्‍सुकता निर्माण केली आहे आणि प्रेक्षकांना त्‍याचे हावभाव पाहायला आवडतात. मला समजले की, माझा लुक एखाद्या 'बिचा-या' महिलेप्रमाणे नाही. माझे प्रबळ व्‍यक्तिमत्‍त्‍व नकारात्‍मक भूमिकेला साजेसे आहे. प्रत्‍येक भूमिकेने सतत दिलेले आव्‍हान व मौजमजेमधूनच मला नकारात्‍मक भूमिका आवडू लागल्‍या.''

 दीपशिखा नकारात्‍मक भूमिका साकारण्‍यामध्‍ये निपुणच आहे, पण तिने विविध शैलींमध्‍ये काम करण्‍याला देखील प्राधान्‍य दिले आहे. ती म्‍हणाली, ''मला कॉमेडी करायला आवडेल. मला वाटते माझ्यामध्‍ये हास्‍यवृत्‍ती देखील आहे. मला वाटते माझे हे कौशल्‍य प्रेक्षकांसमोर अधिक सादर करण्‍यात आलेले नाही. मी माझ्यामधील विनोदी कौशल्‍य सादर करण्‍याची अधिक संधी मिळतील, अशी आशा करते.'' 

जयपूरची सुंदर पार्श्‍वभूमी असलेली मालिका 'मैं भी अर्धांगिनी' एका प्रेमकथेला सादर करते. ही प्रेमकथा एका लबाड सावत्र आईचा प्रामाणिक व आज्ञाधारक मुलगा माधवच्‍या जीवनाला सादर करते. ही सावत्र आई त्‍याच्‍यावर प्रेम असण्‍याचे आणि त्‍याची काळजी असण्‍याचे ढोंग करते. माधव (अविनाश सचदेव) आणि त्‍याची अर्धांगिनी वैदेही (अदिती रावत) यांच्‍यामधील बहुमूल्‍य नाते सादर करणारी मालिका 'मैं भी अर्धांगिनी' नि:स्‍वार्थी व अतूट प्रेमाची खरी भावना सादर करेल, जेथे वैदेही 'अर्धांगिनी'ची खरी जबाबदारी पार पाडते. दुसरीकडे माधवची पहिली पत्‍नी चित्रा (अंजली प्रिया) तिच्‍या मृत्‍यूनंतर देखील आत्‍म्‍याच्‍या रुपात त्‍याच्‍यावर प्रेम करते. ही कथा माधव व वैदेही या दोघांनाही एकत्र ठेवत दुष्‍टापासून त्‍यांचे संरक्षण करणा-या प्रयत्‍नांना दाखवणार आहे. 'मैं भी अर्धांगिनी'चे कलाकार व टीम लवकरच गुलाबी शहर जयपूरमध्‍ये चित्रीकरणाला सुरूवात करणार आहेत.