Join us  

मतदार यादीतून नाव Delete झालंय तरीही करता येईल मतदान! आदिती सारंगधरने सांगितला उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 11:58 AM

आदिती सारंगधरने मतदान यादीतून नाव Delete झालेल्या लोकांसाठी खास उपाय सांगितलाय. त्यामुळे सर्वांना मतदानाचा हक्क बजावता येईल (aditi sarangdhar)

आज लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा पार पडतोय. मुंबईत आणि अनेक ठिकाणी मतदान पार पडतंय. सामान्य माणसांपासून राजकारणी आणि कलाकारांपर्यंत अनेक कलाकारही त्यांचा मतदानाचा हक्क बजावत आहेत. अशातच मराठी  मनोरंंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आदिती सारंगधरने नागरिकांना एक महत्वाची माहिती दिली आहे. आदितीने मतदार यादीतून नाव डिलीट झालं असेल तर काय करावं, याचा उपाय सांगितला आहे.

आदितीने मतदान केल्यानंतर बोटाला शाई लावतानाचे फोटो शेअर केलेत. आदिती सांगते, "*महत्वाचा निरोप* ज्यांची नावे मतदार यादीतून delete झाली आहेत, म्हणजे यादीत नावावर *deleted* असा शिक्का लागला आहे.ते लोक मतदान केंद्रावर *form no 17* भरून आणि आपले voting कार्ड दाखवून मतदान करू शकणार आहेत.तरी विनंती आहे कि ज्यांची नावे यादीमध्ये दिसत नाहीत त्यांनी मतदान केंद्रावर येऊन वरील procedure follow करावी आणि मतदानाचा हक्क बजवावा."

आदितीने शेवटी "मतदान करावे..आणि भरभरून करावे.." असं आवाहन सर्वांना केलंय. अशाप्रकारे आदितीने मतदान करण्यासाठी नागरिकांना सोप्पा पण महत्वाचा उपाय सांगितला आहे. आदितीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर.. तिला आपण 'वादळवाट', 'येऊ कशी तशी मी नांदायला', 'ह.म.बने तु.म.बने' अशा मालिकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. आदिती सध्या अभिनेता आस्ताद काळेसोबत 'मास्टर माईंड' नाटकात काम करतेय

टॅग्स :मराठीमराठी अभिनेता