Join us

पहिलं लग्न तुटल्यावर आपल्यापेक्षा 10 वर्षांनी लहान असलेल्या व्यक्तिला डेट करतेय ही अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2020 14:38 IST

सध्या तिच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा आहे.

पहिले लग्न तुटल्यानंतर टीव्ही अभिनेत्री डेलनाज इराणी डीजे पर्सी करकरियाला डेट करते आहे. दोघे अनेक वर्षांपासून एकमेकांनासोबत रिलेशनशीपमध्ये आहेत. आजतकच्या रिपोर्टनुसार डेलनाज बॉयफ्रेंड पर्सीच्या घरात शिफ्ट झाली आहे.  सध्या दोघे एका छता खाली राहतायेत.

डेलनाज आणि पर्सीच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. मात्र स्पॉटबॉयशी बोलताना डेलनाजने लग्नाच्या चर्चा फेटाळल्या होत्या. डेलनाज म्हणाली, आम्ही लग्न नाही करत आहोत. पण आम्ही एकत्र आहोत आणि खुप खुश आहोत.

  डेलनाजने बॉयफ्रेंड पर्सीसोबत खुश असल्याचे स्पष्ट केले आहे मात्र लग्नाचा एवढ्यात काहीच विचार नसल्याचे तिने सांगितले होते. पर्सी डेलनाजपेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. मात्र वयातले अंतर त्यांच्यामध्ये कधी आले नाही.

डेलनाज आणि पर्सीच्या नात्याची सुरुवात मैत्रीपासून झाली होती. जवळपास दोघे एकमेकांना 10 वर्षांपासून डेट करत आहेत. डेलनाजचं पहिलं लग्न टीव्ही अभिनेता राजीव पॉलशी झाले होते.

दोघांची ओळख 1993 मध्ये परिवर्तन मालिकेच्या सेटवर झाली होती. 1998 मध्ये दोघांनी लग्न केले होते. 2010मध्ये दोघे वेगळे झाले. 2012मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. रिपोर्टनुसार डेलनाजने राजीववर धोका दिल्याचा आरोप लावला होता.