Join us

"माझी पत्नी काहीही...", ३५ पुरणपोळ्यांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 7:30 PM

"३५ पुरणपोळ्या खायचे", अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर म्हणाले...

छोट्या पडद्यावरील 'खुपते तिथे गुप्ते' हा लोकप्रिय शो सध्या चर्चेत आहे. मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते या शोचं सूत्रसंचालन करतो. कलाकारांसह अनेक राजकीय नेतेही या शोमध्ये सहभागी होतात. या शोच्या नवीन भागात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजेरी लावणार आहेत. 'खुपते तिथे गुप्ते'च्या या नव्या भागातील एक व्हिडिओ समोर आला आहे. 

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एका शोदरम्यान केलेल्या वक्तव्याची प्रचंड चर्चा झाली होती. 'किचन कलाकार' या शोमध्ये अमृता यांनी "देवेंद्र फडणवीस पातेलंभर तूप घेऊन ३५ पुरणपोळ्या आरामात खाऊन टाकायचे," असं वक्तव्य केलं होतं. अमृता फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. याबाबत फडणवीसांनी 'खुपते तिथे गुप्ते'मध्ये खुलासा केला आहे. 

"योगी आदित्यनाथ यांच्या भूमिका मला पटतात", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं वक्तव्य चर्चेत

"माझी पत्नी गमतीत अनेक गोष्टी बोलते आणि नंतर मला ते सहन करावं लागतं. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो...मला पुरणपोळी एवढी आवडत नाही," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 'खुपते तिथे गुप्ते'मधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

"...पेंग्विन वापरायची काय गरज होती", राज्याच्या राजकारणावरुन शशांक केतकरने केलेली पोस्ट चर्चेत

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या पेशाने बँकर आहेत. त्या उत्तम गायिकाही आहेत. त्यांच्या अनेक गाण्यांना चाहत्यांनी पसंती दर्शविली आहे. त्या सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. समाजातील घडामोडींवर त्या परखडपणे त्यांचं मत मांडताना दिसतात. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसमहाराष्ट्रभाजपाअमृता फडणवीस