Join us

Devmanus 2: बज्यानं शेअर केला ‘तो’ शेवटचा सीन, भावुक झाला अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2022 4:33 PM

Devmanus 2: बज्याची भूमिका साकारणाराअभिनेता किरण डांगेनं मालिकेतील शेवटच्या दिवसाचा सीन शेअर करत खास पोस्ट शेअर केली. त्याची ही पोस्ट वाचून अभिनेता  सागर कोरडे  चांगलाच भावूक झाला...

Devmanus 2:  झी मराठीवरची ‘देवमाणूस’ ही मालिका प्रचंड गाजली. यानंतर या मालिकेचा सीक्वल अर्थात  ‘देवमाणूस 2’ आली. या मालिकेला सुद्धा प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. आता ही मालिका अखेरच्या टप्प्यात आहे. होय, ‘देवमाणूस 2’ लवकरच निरोप घेतेय. साहजिकच मालिकेतील अनेक कलाकार भावुक झालेले पाहायला मिळत आहेत. बज्या तर फारच इमोशनल झाला आणि त्याची पोस्ट वाचून आणखी एक अभिनेता तर त्याच्यापेक्षाही जास्त इमोशनल झाला.बज्या हा ‘देवमाणूस’ आणि ‘देवमाणूस 2’ या मालिकेतील महत्त्वाचं कॅरेक्टर. अजितकुमारनं  बज्या बापूला असं काही आपल्या जाळ्यात ओढलं होतं की अनेकदा अजितकुमारसाठी त्याने जीवाची बाजी लावली. मात्र अखेर बज्याला सुद्धा अजिकुमारचा खरा चेहरा कळलाच.   अजितकुमारंचं सत्य समोर आल्यानं बज्या आत्महत्या करतो, असं मालिकेत दाखवण्यात आलं.

मालिकेत बज्याची भूमिका साकारणाराअभिनेता किरण डांगेनं (Kiran Dange) त्याच्या मालिकेतील शेवटच्या दिवसाचा सीन शेअर करत खास पोस्ट शेअर केली. त्याची ही पोस्ट वाचून मालिकेतील अभिनेता  सागर कोरडे  चांगलाच भावूक झाला आहे.होय, अभिनेता सागर कोरडे याने किरणच्या पोस्टवर कमेंट करत, त्याचं कौतुक केलं आहे.सागरने ‘देवमाणूस’मध्ये संजूची भूमिका साकारली होती.

किरण डांगेच्या पोस्टवर त्याने कमेंट केली आहे. ‘मालिकेचा शेवटचा दिवस किती अवघड असतो हे मी समजू शकतो. किरण आठवतं मला अचानक सांगितले होते की आता तुझा खुन होणार. मी खुप भावुक झालो होतो. तुम्ही सगळ्यांनी माझी समजूत काढली होती. वाईट माझे मालिकेतले काम संपणार म्हणून नव्हते वाटत, तर तुम्हाला सगळ्यांना सोडुन जायचे वाटतं होते. काम तर आजही चालुच आहे पण खरं प्रेम, खरा परिवार आपल्या देवमाणूस सेटवरच अनुभवायला मिळाला. बज्याबापुला नक्कीच प्रेक्षक खुप मिस करतील. कारण तुझ्याविषयी एक वेगळाच सॉफ्ट कॉर्नर तयार झाला होता प्रेक्षकांच्या मनात. तु खऱ्या अर्थाने बज्या हे पात्र जिवास भावा. किरण तुला पुढच्या वाटचालीसाठी मनापासून खूप शुभेच्छा..., असं त्याने लिहिलं आहे.

टॅग्स :'देवमाणूस २' मालिकाटेलिव्हिजन