Join us

लवकरच 'ही' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, त्याजागी 'देवमाणूस २' येणार भेटीला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2021 20:43 IST

‘देवमाणूस’ या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली होती.

झी मराठी वाहिनीवरील ती परत आलीये ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. सायली, अभ्या, रोहिणी, अनुजा, हनम्या, विक्रांत, मॅंडी, बाबुराव, लोखंडे या सर्व पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. नुकतेच या मालिकेतील हनम्याने एक्झिट घेतली आहे. त्यामुळे त्याच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या मुखवटा घातलेल्या व्यक्तीच्या ते शोधात आहेत. मालिकेच्या सुरुवातीपासूनच कुंजीका काळविंट, तन्वी कुलकर्णी, विजय पाटकर, अनुप बेलवलकर, वैष्णवी करमरकर, श्रेयस राजे, समीर खांडेकर, नचिकेत देवस्थळी, प्रथमेश शिवलकर या कलाकारांनी मालिकेत प्रमुख भूमिका केल्या आहेत. काही महिन्यांच्या कालावधीतच मालिकेच्या निर्मात्यांना मालिका बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागतो आहे. त्यामुळे या मालिकेच्या जागी आता कोणती नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. 

ती परत आलीये या मालिकेच्या जागी येत्या काही दिवसात देवमाणूस ही लोकप्रियता मिळवलेली मालिका पुन्हा एकदा नव्या रुपात पाहायला मिळणार आहे, अशी शक्यता वर्तवली जात आहे.  दरम्यान सोशल मीडियावर एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

एका फॅन पेजवर देवमाणूस मालिकेचे पोस्टर शेअर केले आहे. हे पोस्टर शेअर करत त्यावर ‘डिसेंबर महिन्यात देवमाणूस २ येणार? सध्या याच्या प्री-प्रोडक्शनचे काम सुरु आहे’ असे लिहिले आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली आहे. त्यामुळे लवकरच ‘देवमाणूस २’ मालिका येणार असल्याचे म्हटले जात आहे. चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पण याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.