देवमाणूस, वैजू नं १ आणि अप्पी आमची कलेक्टर मालिकेतून छोट्या मोठ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री निलम पांचाळ (Nilam Panchal) हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या आईचं सोमवारी निधन झाले. त्या ७४ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पण अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. निलम पांचाळची आई वसंतीबेन पांचाळ यांचे सोमवारी निधन झाले. त्या गेल्या काही दिवसांपासून खूप आजारी होत्या. एका खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. आईला लवकर बरे व्हावे यासाठी नीलम महाकुंभ मेळ्यात अन्नदान करताना दिसली होती. मात्र आईच्या प्रकृतीत काहीच सुधारणा होत नव्हती. गेल्या ४ दिवसांपासून त्यांची तब्येत खूपच खालावली होती. आईसाठी प्रार्थना करा अशी इन्स्टाग्रामवर तिने पोस्ट लिहिली होती. पण उपचार सुरू असतानाच ११ मार्च रोजी निलमच्या आईचे दुःखद निधन झाले. अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली.
वर्कफ्रंटनिलम पांचाळ ही गुजराती अभिनेत्री आहे. तिला हेलारो या चित्रपटातील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ती मराठी मालिका अभिनेता, लेखक मिहीर राजदा याची पत्नी आहे. मिहिरने हिंदी मालिकेनंतर मराठी मालिकेत काम केले आहे.