Join us

‘देवमाणूस’ मालिका संपली, पण ‘या’ गोष्टी दाखवल्याच नाहीत...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2021 8:00 AM

‘देवमाणूस’ (Devmanus) ही मराठी मालिका प्रचंड गाजली. अल्पावधीत लोकप्रिय झाली. काही दिवसांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. पण...

ठळक मुद्दे मालिकेत डॉक्टर अजितकुमार देव अर्थातच देवीसिंगने अनेक निष्पाप महिलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचा नाहक बळी घेतल्याचे दाखवले गेले होते.

‘देवमाणूस’ (Devmanus) ही मराठी मालिका प्रचंड गाजली. अल्पावधीत लोकप्रिय झाली. काही दिवसांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. गेल्या 15 ऑगस्टला मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित करण्यात आला. मालिका संपली, पण काही गोष्टींचा खुलासा न झाल्याची रूखरूख प्रेक्षकांना राहिली, होय, डिंपलचे शेवटी काय झाले? नाम्याचे लग्न या गोष्टी शेवटपर्यंत मालिकेत दाखवल्या गेल्या नाहीत. मालिकेत डॉक्टर अजितकुमार देव अर्थातच देवीसिंगने अनेक निष्पाप महिलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचा नाहक बळी घेतल्याचे दाखवले गेले होते. त्याचं हे भिंग उघड पडण्यासाठी एसीपी दिव्या सिंग त्याला कोर्टात खेचते. मात्र आपल्या धूर्त बुद्धीने डॉक्टर सुटतो. आणि  दिव्याचा प्रयत्न असफल होतो. डॉक्टरला हे सर्व गुन्हे लपवण्यासाठी डिंपल त्याला मदत करत असते.

तुम्हाला माहित असेलच की ‘देवमाणूस’ ही मालिका एका सत्यघटनेवर आधारित होती. होय, सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील एका गावी घडलेल्या एका किलर डॉक्टरची खरीखुरी कथा या मालिकेत रंगवण्यात आली होती. या  डॉक्टरचे नाव होते संतोष पोळ.  याच संतोष पोळ नामक डॉक्टरची व्यक्तिरेखा अभिनेता किरण गायकवाडने (Kiran Gaikwad ) रंगवली होती.

देव माणूस मालिकेमध्ये अजित कुमार देव याला कधीही अटक झाल्याचे दाखवण्यात आलेले नाही. प्रत्यक्षात अशी अटक पाहायला प्रेक्षकांना आवडले असते. त्याचप्रमाणे डिंपल ही पोलिसांच्या तावडीत सापडते, हे देखील दाखवण्यात आलेले नाही. त्यामुळे नेमके तिचे काय झाले हे समजले नाही. ‘एका बुक्कीत’ असा डायलॉग तोंडी असणारा बज्या एका बुक्कीत कोणाला गार करणार होता, याचा खुलासाही शेवटपर्यंत झाला नाही. डिंपल पोलिसांच्या तावडीत सापडते का? तिचे नंतर काय होते? याचा उल्लेखही मालिकेत सरतेशेवटी झाला नाही. श्विाय नाम्याचे लग्न कोणासोबत होणार, हा प्रश्नही मालिका संपल्यावर अनुत्तरीत राहिला.

टॅग्स :झी मराठीकिरण गायकवाड